नागपुरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; दिल्ली पासिंग कारमधून तस्करी, सिटच्या खाली ठेवला गांजा

नागपुरात अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करण्यात आली. 16 लाख रुपये किमतीचा 107 किलो गांजा जप्त केला. दिल्ली पासिंग असलेल्या कारमधून ही तस्करी केली जात होती. कारच्या सीट खाली खास जागा बनवली होती.

नागपुरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; दिल्ली पासिंग कारमधून तस्करी, सिटच्या खाली ठेवला गांजा
कारवाई करणारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस.
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 4:11 PM

नागपूर : एका दिवसा आधीच ड्रग्स तस्करी (Drug trafficking) पकडण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर आता 107 किलो गांजा पोलिसांनी पकडला. त्यामुळं नागपूर हे ड्रग माफियाच केंद्र बनत आहे का असे प्रश्न पडायला लागलेत. अमली पदार्थ विरोधी पथकाला (Anti-Malignant Squad) गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, हैदराबादकडून दिल्लीकडे जाणारी एक दिल्ली पासिंगची कार निघाली. त्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आहेत. पोलिसांनी जबलपूर हायवेवर सापळा (Trap on Jabalpur Highway) रचला. माहिती मिळालेली कार आली. प्राथमिक दृष्ट्या कारमध्ये असलेल्यांची चौकशी करण्यात आली. कारची तपासणी केली असता काहीच मिळून आलं नाही. मात्र पोलिसांना संशय आला त्यांनी कारची सिट उघडली असता त्यात पॅकेट दिसले.

सिटच्या खाली सापडला गांजा

चोरट्यांनी कारची तपासणी केली असता काही सापडले नाही. परंतु, कारच्या सिटच्या खाली त्यांना काही पॅकेट्स सापडले. त्या पॅकेट्समध्ये गांजा असल्याचं स्पष्ट झालं. त्यात 107 किलो गांजा निघाला. त्याची बाजारात किंमत 16 लाख रुपये एवढी आहे. पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली. त्यांची कारसुद्धा जप्त केली, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक मनोज सीडाम यांनी दिली.

गांजा तस्कर पोलिसांसमोर आव्हान

ड्रग्स म्हणा किंवा गांजा तस्कर वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्था करून तस्करी करतात. मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या कारवाया बघीतल्या तर नागपूर हे ड्रग्स माफियांच केंद्र बनताना दिसून येत आहे. त्यामुळं या ड्रग्स माफियां विरोधात कारवाई करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. हे आव्हान ते कसे पेलतात. आणि तस्कर त्यांना हुलकावणी देऊन पुन्हा तस्करी करणार काय हे पाहावे लागेल. अशा तस्करांविरोधात योग्य पुरावे गोळा करून कडक कारवाई करणे गरजेची आहे. अन्यथा हे तस्कर पुन्हा आपले हातपाय हलवतील.

Spices Price | मिरचीसह मसाल्यांना महागाईचा ठसका, खसखस व लवंगला सोन्याचा भाव…

Nagpur Collector | नागपूर जिल्ह्यात आज फेरफार अदालत; कुठे करता येणार शेती-मालमत्तेची फेरफार?

मॅनेजर बायकोच्या चारित्र्यावर संशय, खुनाच्या इराद्याने ऑफिस गाठलं, चाकू हल्ल्यात बॉस गंभीर