VIDEO: आमदार श्वेता महाले यांचा रुद्रावतार, बँकेच्या व्यवस्थापकास झापले; कसा झाला शेतकऱ्यांचा फायदा?

| Updated on: Jan 14, 2022 | 6:52 PM

आमदार श्वेता महाले यांनी महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकास एकेरी भाषेत झापले. शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावला म्हणून महाले चिडल्या. तर व्यवस्थापकास मारण्याची भाषा वापरली.

VIDEO: आमदार श्वेता महाले यांचा रुद्रावतार, बँकेच्या व्यवस्थापकास झापले; कसा झाला शेतकऱ्यांचा फायदा?
चिखलीच्या आमदार श्वेता महाले
Follow us on

बुलडाणा : अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पिकविम्याची आलेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांना (farmer) दिली जात नव्हती. ती रक्कम परस्पर शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वळती केली जात होती. किंवा त्या खात्याला होल्ड करणाऱ्या चांडोळ येथील बँक व्यवस्थापकास (Manager) आमदार श्वेता महाले यांनी चांगलेच धारेवर धरत एकेरी भाषेत झापले. यावेळी मॅनेजरला माफीसुद्धा मागायला लावली. आमदार महाले ह्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड का लावला म्हणून चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काल गेल्या होत्या. यावेळी महाले यांनी मॅनेजरला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड काढण्यास भाग पाडले. अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. यावेळी आमदार महाले यांनी मॅनेजरला मारण्याची भाषा ही केलीय.

समज देऊन काही झाले नव्हते

बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक विरुध्द अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या मनमानीसह उद्धट वागणुकीबद्दल तक्रारी केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पीक विम्याचे आलेले पैसे न देता त्यांचे पैसे शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे परस्पर कर्ज खात्यात जमा केल्या जात होते. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरत चालला होता. या बँक व्यवस्थापकास अनेकदा फोन करून समज दिली तरीही आमदार श्वेता महाले यांचे त्यांनी ऐकले नाही, तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या.

शेतकऱ्यांना मिळणार हक्काचे पैसे

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांना सांगूनही सदर बँक व्यवस्थापकाचा कारभार सुधारला नव्हता. त्यामुळं आमदार श्वेता महाले यांनी काल बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकास घेराव घालून जाब विचारलाय. यावेळी त्याला आमदारांनी चांगलेच झापले. यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होतो. तर आमदारांच्या या अवतारानंतर बँकेने लावलेला होल्ड काढला. आणि आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली, अशी माहिती आमदार श्वेता महाले यांनी दिली.

संबंधित बातम्या:

Nagpur | पशुसंवर्धन मंत्र्यांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी; सुनील केदार यांनी काय केल्यात घोषणा?

Nagpur School | सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध, शिक्षणाची जिम्मेदारी घेणार कोण ?, प्रा. सचिन काळबांडे म्हणतात…

Nagpur | कोरोनाने आणले बंधन! मंगल कार्यालयात व्हिडीओ शुटिंग अनिवार्य; मेयो-मेडिकलमध्ये फेस शिल्डचा वापर