Video | कोरोना काळात मुंबई मनपाला लुटलं, Devendra Fadnavis यांचा शिवसेनेवर घणाघात, 24 महिन्यांत 38 मालमत्ता!

| Updated on: Mar 27, 2022 | 12:11 PM

बीएमसीच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटले जात आहे का? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, शंभर टक्के बीएमसीच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटलं जात आहे. 24 महिन्यांत 38 संपत्ती. त्याही कोविडच्या काळामध्ये. आम्ही आधीच म्हणत होतो कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे.

Video | कोरोना काळात मुंबई मनपाला लुटलं, Devendra Fadnavis यांचा शिवसेनेवर घणाघात, 24 महिन्यांत 38 मालमत्ता!
नागपूर विमानतळावर बोलताना देवेंद्र फडणवीस.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, यशवंत जाधव (Yashwant Jadhav)  यांची आयकर विभाग चौकशी करत आहे. त्यामुळं या विषयावर अधिक बोलणं योग्य होणार नाही. यशवंत जाधव यांनी कोविडच्या काळात 24 महिन्यांत 38 मालमत्ता खरेदी केल्या आहेत. कोविड काळात मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) लुटलं आहे. डायरीत नेमकी काय नोंद आहे. हे मी बघीतलेलं नाही. मात्र आयकर विभाग ज्या काही नोंदी आहेत त्यासंदर्भात उचित चौकशी करेल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. नागपुरात विमानतळावर (Nagpur Airport ) आल्यानंतर फडणवीस बोलत होते.

कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार

बीएमसीच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटले जात आहे का? यावर फडणवीस म्हणाले, शंभर टक्के बीएमसीच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटलं जात आहे. 24 महिन्यांत 38 संपत्ती. त्याही कोविडच्या काळामध्ये. आम्ही आधीच म्हणत होतो कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही होत नव्हते, हे आता स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात आयकर विभाग उचित चौकशी करेल. मला वाटत नाही की याबद्दल मी यापेक्षा जास्त प्रतिक्रिया दिली पाहिजे.

कोण आहेत यशवंत जाधव

यशवंत जाधव हे माजी नगरसेवक आहेत. ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याबाबत एक डायरी उघडकीस आली आहे. 2018 ते 2022 च्या दरम्यान घडी आणि दोन कोटी रुपयांच्या लेनदेणीचा उल्लेख आहे. या डायरीत 50 लाख रुपयांची घडी आणि दोन कोटी रुपये मातोश्रीला देण्यात आल्यासंदर्भात लिहिण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील बांद्रा येथे मातोश्री नावांच घर आहे. नवीन वर्षात गिफ्ट वाटण्यासाठी हे दोन कोटी रुपये दिले गेल्याचा आरोप आता किरीट सोमय्या यांनीही केला आहे. तर यशवंत जाधव मातोश्री म्हणजे माझी आई, अशी सारवासारव करत आहेत.

Photo | नेत्रदीपक aeromodelling show ने जिंकली नागपूरकरांची मने, मानकापूर स्टेडियमवर नजरा आकाशात

Nagpur | महसूल अधिकाऱ्यांनी जलद सेवा द्याव्यात, जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांचे आवाहन

एरोमॉडेलिंग शोसाठी मानकापूर स्टेडियम सज्ज, आज 5 हजार मुलांच्या उपस्थितीत आकाशात थरार