Photo | अबब!! गणपती बाप्पासाठी महाकाय बुंदीचा लाडू, कुठे बनलाय? वजन माहितीय?

| Updated on: Jan 25, 2023 | 12:01 PM

आज चतुर्थीनिमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी हा लाडू प्रसाद म्हणून देण्यात येतोय.  नागपूर येथील टेकडी गणेश मंदिर प्रसिद्ध आहे.

Photo | अबब!! गणपती बाप्पासाठी महाकाय बुंदीचा लाडू, कुठे बनलाय? वजन माहितीय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गजानन उमाटे, नागपूरः आज माघ महिन्यातील गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) निमित्ताने गणपती बाप्पासाठी (Ganpati Bappa) महाकाय लाडूचा प्रसाद अर्पण करण्यात आलाय. बुंदीचा लाडू असला तरी विविध रंगीबेरंगी मिठायांनी सजवलेला असल्याने हा लाडू भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. नागपुरातल्या (Nagpur) टेकडी गणेश मंदिरात हा लाडू तयार करण्यात आला आहे. आज चतुर्थीनिमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी हा लाडू प्रसाद म्हणून देण्यात येतोय.  नागपूर येथील टेकडी गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात आज माघ चतुर्थी निमित्त बाप्पाच्या चरणी तब्बल 1100 कोली लाडूचा प्रसाद अर्पण करण्यात आलाय.

श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे श्री गणेश टेकडी मंदिरात 1100 किलोचा लाडू अर्पण करण्यात आलाय.

माघ चतुर्थी निमित्त टेकडी गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे टेकडी गणेश मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे.

नागपूरचं दैवत म्हणून टेकडी गणपतीची ओळख आहे. नागपुरातून नव्हे तर मध्य भारतातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यातच आज

माघ चतुर्थी का महत्त्वाची?

पौराणिक मान्यतामनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. याच दिवश सर्वप्रथम गणेश लहरी पृथ्वीवर आल्या. गणपतीचे एकूण तीन अवतार मानले जातात. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरी केली जाते. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी म्हणून गणपतीच्या मूर्ती स्थापन करून हा उत्सव साजरा केला जातो. तर तिसरा अवतार माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते.