Nitin Gadkari: राज्यात कोळश्याची टंचाई, विजेचं संकट वाढलं; नितीन गडकरींनी कोणता सल्ला दिला?

Nitin Gadkari: महाराष्ट्रात कोळश्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे विजेचं संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

Nitin Gadkari: राज्यात कोळश्याची टंचाई, विजेचं संकट वाढलं; नितीन गडकरींनी कोणता सल्ला दिला?
वाढत्या ऊस क्षेत्रावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2022 | 8:11 AM

नागपूर: महाराष्ट्रात (maharashtra) कोळश्याची प्रचंड टंचाई (coal shortage) निर्माण झाली आहे. त्यामुळे विजेचं संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी राज्य सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या कोळशात दगडही पाठविले जातात. नाशिक-कोराडीतील औष्णिक वीज प्रकल्पात कोळशातून आलेले दगडाचे ढीग पाहायला मिळतात याकडे लक्ष वेधतानाच ज्या कोळसा खाणी बंद आहेत किंवा आर्थिक अडचणीत आहेत. त्या कोळसा खाणी सुरु करण्यासाठी खासगीकरणाचा वापर करून पाहावा, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला आहे. कोळशाचे अधिक उत्पादन वाढविणे आता आवश्यक झाले आहे. प्रशासनाने 4-4 वर्षे फाईल दाबून ठेवणे बंद करावे. यापूर्वीच कोळशाचे उत्पादन वाढले असते तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता, असे मतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

नागपुरात वेस्टर्न कोल फिल्डसच्या सीएसआर फंडातून दिव्यांग लोकांना विविध साहित्याच वाटप करण्यात आलं. यावेळी संबोधित करताना नितीन गडकरी यांनी हा सल्ला दिला. कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फिल्ड्सने स्वस्त कोळसा दिल्यामुळेच आज गरिबांना स्वस्त वीज मिळत आहे. शासनाने कोळसा कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. अमोनियम नायट्रेटचा तुटवडा आपल्या देशात आहे. वेस्टर्न कोल फ्लिड्सने अमोनियम नायट्रेट व मिथेनचे उत्पादन करण्याची परवानगी द्यावी. यासोबतच डीएमई बनविले तर घरगुती वापरासाठी गॅसमध्ये ते मिसळता येईल व सिलेंडरचे दर स्वस्त होईल, असे गडकरी म्हणाले

तर रेती माफियाचा काळाबाजार नियंत्रणात राहील

खाणींमधून निघालेल्या मातीतून रेती वेगळी करून ती स्वस्त किंमतीत उपलब्ध करून दिली तर गरिबांचा फायदा होईल. त्यामुळे रेती माफियांचा काळा बाजार नियंत्रणात राहील, असे ही गडकरी म्हणाले. वेस्टर्न कोल फिल्डसने आपल्या रिकाम्या जागा, टेकड्या सामाजिक संघटनांना वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

संबंधित बातम्या:

Subhash Desai Mihan | नागपूरमध्ये अॅडव्हाँटेज महाराष्ट्र उपक्रम, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आश्वासन

MSEDCL | भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्तीचे प्रयत्न, ग्राहकांनी विजेचा वापर काटकसरीने करावा

Ravi Rana on Hanuman Chalisa | शिवसेना आता काँग्रेस सेना झालीय, अमरावतीत आमदार रवी राणा यांची टीका