Nitin Raut | वीज भारनियमन कोल इंडिया लिमिटेड कंपनीमुळं, नागपुरात नितीन राऊतांचं स्पष्टीकरण

राज्यात काही ठिकाणी भारनियमन करावं लागतं. वीज भारनियमन हे कोल इंडिया लिमिटेड कंपनीमुळं करावं लागतं, असं खापर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी फोडलं. विरोधकांनी फक्त टीका करण्यापेक्षा समस्या कशी सुटेल, यावर लक्ष केंद्रीत करावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

Nitin Raut | वीज भारनियमन कोल इंडिया लिमिटेड कंपनीमुळं, नागपुरात नितीन राऊतांचं स्पष्टीकरण
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 5:32 AM

नागपूर : कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) ही कंपनी देशातल्या सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते. त्यांच्या व्यवस्थापनामुळे (Management) समस्या निर्माण झाली आहे, असं खापर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी फोडलं. कोळशाच्या उपलब्ध परिस्थितीनुसार दररोज कोळसा दिला जातो. या स्थितीमध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाची परिस्थिती आहे. देशाची परिस्थिती नाही तर केंद्रीय मंत्र्यांनी (Union Minister) सर्व राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांसोबत चर्चा का केली. तुम्हाला कोळसा खरेदी करायचा असेल तर इम्पोर्टेड कोळसा खरेदी करावा, असं सांगितलं. याचा अर्थ देशांमध्ये आणि राज्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झालाय. कोरोनानंतर विजेची मागणी वाढली आहे. मात्र राज्य सरकारने पूर्णपणे व्यवस्थापन केले आहे. अधिकारी आमचे रोज नजर ठेवून आहेत. बैठका घेत आहेत. ही वेळ या देशात दुसऱ्यांदा आलेली आहे. राज्य सरकारची यात अजिबात चूक नाही. आम्हाला आता कोळसा वापरून पावसाळ्यासाठीसुद्धा साठा करून ठेवायचा आहे, असंही राऊत म्हणाले.

वीजसंकट भांडणामुळं नाही

नितीन राऊत यांनी सांगितलं की, राज्यामध्ये जी संकटे निर्माण झालं ते कुणाच्याही भांडणामुळे निर्माण झालेलं नाही. आम्ही काम करतो आहोत. मात्र काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावं. मात्र दोन वर्षांत अडीच वर्षात आम्ही आजही व्यवस्थित पुरवठा करू शकलो. मात्र केंद्र सरकारने बँकांना पत्र लिहून महाडिस्कोला कर्ज देऊ नका, असं पत्र दिलं आहे. ग्रामविकास खात्याने 8 हजार कोटी रुपये दिले नाहीत. त्यामुळे आमची थोडी कुचंबना झाली आहे. त्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. तक्रार दिली आहे.

बँका कर्ज द्यायला तयार नाहीत

जर आम्हाला हे पैसे मिळाले तर वीज घ्यायला शक्य होईल. 19 तारखेपर्यंत मी नियोजन केलेलं आहे. सर्व परिस्थिती सुरळीत होईल. सर्व पर्यायांवर आम्ही लढतो आहोत. बँका आम्हाला कर्ज द्यायला तयार नाही. म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रावसाहेब दानवेंनी आरोप करण्यापेक्षा चार बोट आपल्याकडे आहेत हे विसरू नये. आरोप करणे खूप सोपे आहे. मात्र राज्य आमचं असेल तर विरोधकांचाही आहे. त्यामुळे सकारात्मक विचार करावा. यामध्ये चर्चा करून विचारविनिमय करून हा प्रश्न कसा सुटेल, यासाठी प्रयत्न करावा, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

टीका करण्यापेक्षा सहकार्य करावे

जे वीजचोर्‍या करतात, वीज बिल भरत नाही. त्यांचं काय करायचं. फुकटात मिळत नाही. पैसा लागतो. माझी राज्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी वीज बिल प्रामाणिकपणे भरावे. त्यांचे उपकार सरकार विसरणार नाही. सरकारी निमसरकारी खात्यात जे नियम जे निकष राज्यातील जनतेला आहे, तेच नियम तेच निकष सर्व खात्यांना लागू आहेत. दानवे साहेबांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आम्हाला सहकार्य करावं, त्यांच्याकडे रेल्वे खाते आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला तपासून घ्यावे, असंही नितीन राऊत म्हणाले.

Nagpur Crime : नागपूरमध्ये भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारमध्ये आढळला मृतदेह

Gadchiroli Naxals | गडचिरोलीत पोलीस खबरे असल्याचा संशय, नक्षलवाद्यांकडून दोन युवकांची हत्या, पालकमंत्री दौऱ्यावर असताना घातपात

Video Ravi Rana on CM Hanuman Chalisa : तर मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचू, आ. रवी राणांचा इशारा, उद्या हनुमान जयंतीला काय होणार?