Nagpur district : नागपूर जिल्ह्यात उद्या ऑरेंज अलर्ट, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये.

Nagpur district : नागपूर जिल्ह्यात उद्या ऑरेंज अलर्ट, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
राज्यात पुढचे पाच दिवस पावसाचेच
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 10:36 PM

नागपूर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्हयात 8 ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. 8 ते 9 ऑगस्ट या दोन दिवसाकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यादिवशी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. या कालावधीमध्ये पावसासोबतच वादळीवारा व वीज पडण्याची शक्यता देखली भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे धरण तोतलाडोह-88 (Totaladoh) टक्के, नवेगाव खैरी-99 (Navegaon Khairi) टक्के, खिंडशी-96 टक्के, वडगाव- 100 टक्के क्षमतेने भरलेले आहे. मध्यम प्रकल्प जसे वेणा, कान्होली बारा, पांढराबोडी, मकरधोकडा (Makardhokda), सायकी, चंद्रभागा, मोरधाम, केसरनाला, उमरी, कोलार, खेकडानाला व जाम हे 100 टक्के भरलेले आहेत. या ठिकाणी सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच जिल्हयातील जवळपास सर्वच लघु प्रकल्प 100 टक्क्यांनी भरलेले आहेत. त्या ठिकाणी देखील सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

नागपूर जिल्ह्यात गेला पुरामुळं 17 जणांचा बळी

पेंच नदीवरील मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात असलेले चौरई धरण देखील 85 टक्के भरलेले आहे. या कालावधीमध्ये छिंदवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 10 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट देण्यात आले आहे. या कारणास्तव या कालावधीमध्ये चौरई धरणातून पाण्याचा अतिविसर्ग होवून तोतलाडोह व नवेगाव खैरी या धरणामध्ये अधिक पाणी येईल. पेंच व कन्हान नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. या वर्षी अगोदर वीज पडल्यामुळे 12 व्यक्तींना तर पुरामध्ये वाहून व नदी आणि नाल्याच्या पाण्यामध्ये बुडून 17 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलेला आहे. सद्यपरिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यक काळजी घेवून स्वरक्षण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

काय काळजी घ्याल

वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरु असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. अतिवृष्टी व वीजगर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील बहुतांश नदी व नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहनाद्वारे अथवा कोणत्याही पध्दतीने पुल पार करण्याचा प्रयत्न करु नये. या कालावधीत भारतीय हवामान खाते तसेच धरण क्षेत्रातील गावातील नागरिकांनी संबंधित विभागाकडून दिल्या जात आहेत. सूचना, हवामानाचा अंदाज, चेतावणी, पाण्याचा साठा, पाण्याचा विसर्ग याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या शासकीय सूचनांचे पालन करण्यात यावे. या कालावधीमध्ये साथीचे रोग पसरत असतात. यामुळे आपण आपलं घर व परिसर स्वच्छ ठेवावा. डासांची पैदास होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. शक्यतोवर घरचे ताजे व शिजलेले अन्न खावे व पाणी स्वच्छ व उकळलेले प्यावे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.