Third Gender Home Scheme | आता तृतीयपंथींना हक्काचा निवारा, या शहराने उचलले समानतेसाठी आणखी एक पाऊल! 150 सदनिकांचा लवकरच ताबा

Third Gender Home Scheme | तृतीयपंथींसाठी हक्काच्या निवाऱ्याची सोय झाली आहे. या शहराने समानतेसाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. तब्बल 150 सदनिकांचा ताबा लवकरच तृतीयपंथींना देण्यात येणार आहे. त्यांना स्वतं

Third Gender Home Scheme | आता तृतीयपंथींना हक्काचा निवारा, या शहराने उचलले समानतेसाठी आणखी एक पाऊल! 150 सदनिकांचा लवकरच ताबा
हक्काचा निवाराImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 11:58 AM

Third Gender Home Scheme | सतत तिरस्कार, अवमान आणि निंदा पदरात घेत आशिर्वाद देणाऱ्या तृतीयपंथींना (Third Gender)समाजाने मानाचे स्थान दिले आहे. तृतीयपंथींचा स्वतंत्र गृहप्रकल्प (Home Scheme)सुरु करण्याकरिता सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास हा राज्यातील तृतीयपंथींचा पहिला स्वतंत्र गृहप्रकल्प ठरणार आहे. तर समानतेचा हा पहिला प्रयोग नागपूर (Nagpur) शहरात राबविण्यात येणार आहे. समाजकल्याण विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व सोपास्कार झाल्यास लवकरच हा प्रकल्प आकार घेईल. यामध्ये 150 सदनिका तयार करण्यात येणार आहे. या सदनिकांचा लवकरच तृतीयपंथींना ताब्यात देण्यात येईल. या योजनेमुळे तृतीयपंथींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यांना एखाद्या शहरात अभिमानाने स्वतंत्र वसाहतीत राहता येणार आहे. समाजाच्या त्यांच्याकडे बघण्याच्या नजरा बदलतील असा विश्वास त्यांना वाटत आहे.

सवलतीच्या दरात घरे

समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी या योजनेची माहिती दिली. त्यानुसार, नागपूर सुधार प्रन्यासकडे सध्या 450 चौरस फुटांच्या 150 सदनिका उपलब्ध आहेत. या सर्व सदनिका स्वतंत्र इमारतीत आहेत. प्रन्यासने या सदनिका विक्रीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाला सादर केला आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला मान्यता देताच पुढील अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे. ज्या तृतीयपंथींकडे ओळखपत्र आणि प्रमाणपत्र असेल त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अगदी सवलतीच्या दरात ही घरे तृतीयपंथींना देण्यात येणार आहे. प्रत्येक तृतीयपंथीला एक घर देण्यात येईल. त्यासाठी त्यांना घराच्या किंमतीच्या 10 टक्के रक्कम द्यावी लागेल. उर्वरीत रक्कम प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून उभी करण्यात येणार असल्याची माहिती नारनवरे यांनी दिली. तसेच तृतीयपंथींना 10 टक्के रकमेसाठी बँकेचे कर्ज ही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

निवाऱ्याची अडचण सूटेल

येथील समाज कल्याण विभागाने तृतीयपंथींच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्यात त्यांनी घर मिळत नसल्याबाबत तक्रार केली होती. आजही तृतीयपंथींना समाजात मानाचे स्थान नाही. त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यांना चांगल्या भागात घर खरेदी करता येत नाही वा कोणी घर ही भाड्याने देत नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने झोपडपट्टीत आश्रय घ्यावा लागत असल्याची व्यथा यावेळी मांडण्यात आली. ही अडचण सोडवण्यासाठी समाजकल्याण विभागाने तृतीयपंथींसाठी स्वतंत्र गृहयोजना उभारण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय झाल्यास तृतीयपंथींना स्वतःच्या मालकीचे घर मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात 20 हजार तृतीयपंथी

तृतीयपंथींच्या अधिकारांसाठी लढणारे बिंदू माधव खिरे यांनी समाजकल्याण विभागाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यात 20 हजार तृतीयपंथी असल्याचा दावा करण्यात येतो. अनेक बोगस तृतीयपंथी आहेत. तर काहींना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. या सर्वांना सन्मानाने राहण्याचा हक्क मिळायला हवा अशी मागणी करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.