जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा पेन्शन घोटाळा, मृतकांच्या नावाची पेन्शन नातेवाईकांच्या खात्यात

शिक्षण विभागात असा गैरव्यवहार होत होता. मग, शिक्षण अधिकाऱ्यांना हे कसं कळलं नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा पेन्शन घोटाळा, मृतकांच्या नावाची पेन्शन नातेवाईकांच्या खात्यात
मृतकांच्या नावाची पेन्शन नातेवाईकांच्या खात्यात
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 04, 2022 | 5:32 PM

नागपूर : जिल्हा परिषदेमध्ये कोट्यवधींचा पेन्शन घोटाळा उघड झालाय. मृतकांच्या नावाची पेन्शन रक्कम जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात केली जात होती. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. यात कनिष्ठ महिला लिपिकाला निलंबित करण्यात आलं. जिल्हा परिषद सीईओ यांनी केली चौकशी समिती गठीत केलीय. या पेन्शन घोटाळ्यात आणखी काही जण अडकण्याची शक्यता आहे.

महिला लिपिकाकडे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची प्रकरणे हाताळण्याचे काम होते. सेवानिवृत्तीनंतर मृत पावलेले कर्मचारी ‘हयात’ असल्याचे दाखवीत त्यांची पेन्शन आपल्या जवळील व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्या खात्यात त्या वळती करीत होत्या.

गेल्या सात, आठ वर्षापासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती महिला कर्मचारी रजेवरही गेली आहे. त्यामुळे तिचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे वर्ग करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्याला मोठा संशय आला. त्यामुळे हे प्रकरण समोर आलेय.

यात मोठा गैरव्यवहार असल्याचे शिक्षण विभागाकडून आलेल्या अहवालातून दिसते. या अहवालाच्या आधारे संबंधित महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आली. चौकशी समितीही गठित करण्यात आली. समिती अहवाल आल्यावर पुढील प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई निश्चित करण्यात येईल, असं नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितलं.

शिक्षण विभागात असा गैरव्यवहार होत होता. मग, शिक्षण अधिकाऱ्यांना हे कसं कळलं नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.