नागपुरातील वंदे मातरम् उद्यानात वीर जवानांच्या गाथा; देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्यांचा गौरव

| Updated on: Feb 05, 2022 | 1:16 PM

परमवीर चक्रविजेते योगेंद्र यादव यांनी कारगिल युद्धातील आठवण सांगितली. कार्यक्रमात अंगावर शहारे आणणारी शांतता पाहायला मिळाली. प्रत्येक जण त्यांचा एकेक शब्द अगदी शांत होऊन ऐकत होता.

नागपुरातील वंदे मातरम् उद्यानात वीर जवानांच्या गाथा; देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्यांचा गौरव
उद्यानाच्या भूमिपूजनाप्रसंगी उपस्थित नितीन गडकरी व इतर.
Follow us on

नागपूर : कारगिलमध्ये आम्ही टनेल बांधत आहोत. त्या ठिकाणी मायनस 8 तापमान आहे. आम्ही त्या ठिकाणी 2 तास थांबू शकलो नाही. त्यापेक्षा ही कठीण ठिकाणी आमचे जवान राहून देशाची रक्षा करतात. त्यांच्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहे, असे उद्गार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी काढले. ते नागपुरात वंदे मातरम उद्यानच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. तर परमवीर चक्र विजेते योगेंद्र यादव (Param Vir Chakra winner Yogendra Yadav) यांनी कारगिल युद्धातील स्वतः अनुभलेले आठवणी सांगितल्या. त्या ठिकाणी अगदी शांत असं वातावरण होऊन प्रत्येकाला गहिवरून आलं. नागपुरात देशातील असं एक उद्यान बनविला जात आहे ज्या ठिकाणी देशासाठी लढणाऱ्या वीर जवानांची गाथा पाहायला मिळतील. देशातील सगळे परमवीर चक्र विजेत्यांचे पुतळे या उद्यानात असेल. याचं भूमिपूजन काल परमवीर चक्र विजेते योगेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari), भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) उपस्थित होते. गडकरी यांनी देशातील जवान हा आपल्या देशासाठी कशी जीवाची बाजी लावतो आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवतो हे सांगितलं.

अंगावर शहारे आणणारी शांतता

यावेळी परमवीर चक्रविजेते योगेंद्र यादव यांनी कारगिल युद्धातील आठवण सांगितली. कार्यक्रमात अंगावर शहारे आणणारी शांतता पाहायला मिळाली. प्रत्येक जण त्यांचा एकेक शब्द अगदी शांत होऊन ऐकत होता. तो थरारक असा अनुभव ऐकून सगळे स्तब्ध झाले होते. तर चंद्रकांत पाटील यांनी यावेळी या देशाला वाचविणारी एक पिढी त्या पिढीला पुढे आणायची गरज आहे. कारण काही लोकांना वाटत की देशाला स्वातंत्र्य असंच मिळालं. त्यांनी लक्षात घ्यावे की यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. महाराष्ट्रात जी अनास्था सुरू आहे, किराणा दुकानात वाइन मिळणार आहे. पिढीला बिघडविण्याचं काम सुरू आहे. अशा लोकांनी योगेंद्र यादव यांच्यासारख्या परमवीर चक्र विजेत्याकडून काही शिकावं, असा टोला राज्यातील सरकारला लगावला.

उद्यान बजेरियावासीसाठी प्राणावायू : नितीन गडकरी

बजेरिया परिसर हा शहरातील अत्यंत गर्दीचा परिसर म्हणून ख्याती प्राप्त आहे. या परिसरात अनेक अडथळे पार करून वंदे मातरम् हे देशातील परमवीरचक्र जवानांना समर्पित उद्यानाची निर्मिती करणे ही महापौर दयाशंकर तिवारी यांची संकल्पना आणि त्यातून साकारणारे उद्यान येथील रहिवाशांसाठी प्राणवायू ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. बजेरिया परिसरातील रहिवासी हे गर्दीच्या ठिकाणी राहतात. येथील ज्येष्ठ, चिमुकले, महिला, तरुण यांना मोकळेपणाने फिरण्यासाठी उद्यान नाही. अशा स्थितीत त्यांच्या परिसरात देशात अधोरेखीत होणारे उद्यान साकारणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या उद्यानामुळे येथील तरुणांना देशसेवेची गोडी लागेलच. शिवाय येथील नागरिकांना फिरण्यासाठी, चिमुकल्यांना खेळण्यासाठी हक्काची जागा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा निकाल आता नऊ फेब्रुवारीला; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती

स्वयंरोजगारासाठी वित्त पुरवठ्याच्या महत्त्वाच्या योजना; नागपुरात कुठे आणि कसा संपर्क साधता येईल जाणून घ्या…

Nagpur Traffic | नेहरूनगर झोनमधील गडरलाईनचे काम सुरू; दोन मार्चपर्यंत वाहतूक मार्गात काय झालेत बदल?