Satish Uke यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, भावासह 6 एप्रिलपर्यंत कोठडी

| Updated on: Apr 02, 2022 | 11:17 AM

ईडीने सतीश उके आणि प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत कोठडी दिलेली आहे. आम्ही ईडीच्या या चुकीच्या कारवाईच्या विरोधात हायकोर्टात जाणार आहोत. हायकोर्टात इलिगल डिटेन्शन आणि इतर मुद्यांच्या आधारे आम्ही जाणार आहोत. गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ, असंही जाधव यांनी सांगितलं.

Satish Uke यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, भावासह 6 एप्रिलपर्यंत कोठडी
वकील सतीश उके यांना ईडी कोठडी
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडी कोठडीतील मुक्काम वाढला. भाऊ प्रदीप उकेसह सहा एप्रिलपर्यंत त्यांना कोठडीत दिवस काढावे लागणार आहेत. सतीश उके यांचे वकील रवी जाधव यांनी ही माहिती दिली. जाधव म्हणाले, आम्ही ईडी कोर्टात युक्तिवाद (Argument in ED Court) केला. ईडीने केलेली कारवाई कशी चुकीची हे कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केला. ईडीने सतीश उके आणि प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत कोठडी दिलेली आहे. आम्ही ईडीच्या या चुकीच्या कारवाईच्या विरोधात हायकोर्टात (Supreme Court) जाणार आहोत. हायकोर्टात इलिगल डिटेन्शन आणि इतर मुद्यांच्या आधारे आम्ही जाणार आहोत. गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ, असंही जाधव यांनी सांगितलं. मनी लाँड्रींग प्रकरणात (Money Laundering Case) सतीश उके यांना अटक करण्यात आली. चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सतीश व प्रदीप उके यांना अटक करण्यात आली. आता ईडीनं सहा एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

चौदा दिवसांच्या कोठडीची केली होती मागणी

नागपुरातून उके यांच्या घरी ईडीने धाड टाकली. पाच तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले होते. मुंबईत आणल्यानंतर पीएमएल कोर्टात न्यायाधीश गिरीश गुरव यांच्यासमोर हजर केले. ईडीने वकील हितेन बेनेगावकर यांनी सतीश आणि त्यांचा भाऊ प्रदीप यांच्या चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी केली. कारण बनावट कागदपत्र आणि मुख्य ठिकाणी दीड एकर जमीन खरेदी प्रकरणात असहकार केल्याचा आरोप आहे. उके यांचे वकील रवी जाधव यांनी ईडीच्या कोठडीला विरोध केला. राजकीय द्वेषातून ही कारवाई केल्याचा आरोप उके यांच्या वकिलांनी केलाय.

उके यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा

उके हे नाना पटोले यांचे वकील आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उके यांनी याचिका दाखल केल्या होत्या. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले, उके यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोर्टात न्यायाधीसांचा अवमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ईडी त्यांच्या नियमानुसार कारवाई करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

Photo : नागपुरात Devendra Fadnavis यांनी उभारली गुढी, मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी दिल्या शुभेच्छा

Nagpur Election | प्रशासकीय राजवटीमुळं माजी नगरसेवकांच्या अडचणीत वाढ, निवडणूक खर्च वाढणार

Akola water | लोहारा येथे पाण्यासाठी मारामारी, पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे, विहिरींमध्ये ठणठणाट