जनाची नाही तर मनाची लाज ठेऊ, सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम ठेऊ, सुधीर मुनगंटीवार यांनी कारण सांगितलं

| Updated on: Nov 27, 2022 | 4:49 PM

कितीदा तुमची जनाची नाही, तर मनाची लाज काढायची. ही लाज जनता निवडणुकीत काढते तेव्हा बघू.

जनाची नाही तर मनाची लाज ठेऊ, सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम ठेऊ, सुधीर मुनगंटीवार यांनी कारण सांगितलं
उद्धव ठाकरे, सुधीर मुनगंटीवार
Follow us on

नागपूर – देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीतील भाषणात ऐकविला. त्यात त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, असा सल्ला दिला. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. मुनगंटीवार म्हणाले, जुने व्हिडीओ काढू नि जणांची नाही मनाची असा सांस्कृतिक कार्यक्रम ठेऊ. उद्धव ठाकरे यांनी उद्देशून म्हणाले, तुम्ही सांगितलं, बांधावर ५० हजार देऊ कुठं देऊ. कुठं गेले. तुम्ही सांगितलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध ठेवणार नाही. मग, नाही ठेवले का संबंध. तुमचा व्हिडीओ आहे. छगन भुजबळ यांच्या संदर्भात तुमची काय वाक्य आहेत. तुम्ही अशा लोकांना पुढं नेता, त्यांनी प्रभू राम आणि कृष्णाला शिव्या दिल्या. कितीदा तुमची जनाची नाही, तर मनाची लाज काढायची. ही लाज जनता निवडणुकीत काढते तेव्हा बघू. कुणाची काढते.

शिंदे गटात गेले म्हणून गटारात गेले म्हणायचं. मग, ते आधी शिवसेनेत होते. शिवसेना म्हणजे गटार आहे का. बोलताना काही तारतम्य असलं पाहिजे. तुम्ही अब्दुल सत्तार यांना प्रवेश दिला तेव्हा ते चांगले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला समर्थन दिल्यानं ते वाईट झाले.

राजकारणात अशी वक्तव्य करताना भूमिका लक्षात घेऊन करताना केलं पाहिजे. जो जसं करेल तसं भरेल. अयोध्येत गेले तर काही नाही. दुसरे कामाख्य देवीच्या मंदिरात गेले तर शिव्या.

मुख्यमंत्र्यांच्या विचारासाठी स्वतःच्या विचार मोडीत काढले. तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. हुकुमशाही वृत्तीला विरोध होतोय. १०० टक्के टीका उद्धव ठाकरे करतात. राज्यासाठी काय केले, हे सांगता येणार नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले.

तिरुपती मंदिरात महाराष्ट्राला जागा मिळाली. दिल्लीत महाराष्ट्र सदन आहे. जागा मिळाली तर सदन उपलब्ध होतो. आसाममध्ये महाराष्ट्र सदन झाल्यास त्यात काय वाईट, असाही समाचार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.