पतीच्या उपचारासाठी पैसे जमा करून आली, रस्त्यात तिची पैशाची बॅगचं चोरट्यांनी लांबविली

नागपुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीच्या उपचारासाठी महिलेनं पैसे आणले.

पतीच्या उपचारासाठी पैसे जमा करून आली, रस्त्यात तिची पैशाची बॅगचं चोरट्यांनी लांबविली
औषधोपचाराचे पैसे चोरट्यांनी लांबविले
Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 13, 2022 | 5:46 PM

सुनील ढगे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील महिला पतीच्या उपचारासाठी पैसे आणि दागिने घेऊन नागपूर बस स्थानकावर पोहचली. मात्र तिच्या पर्समधील दागिने आणि पैसे असा 2 लाख 29 हजारांचा मुद्दे माल चोरट्याने क्षणात पळविला. पतीचा उपचार कसा करायचा या संभ्रमात महिला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला. पण, आता उपचार कसा करायचा असा प्रश्न संबंधित महिलेला पडला आहे.

नागपुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीच्या उपचारासाठी महिलेनं पैसे आणले. हे पैसे महिलेच्या बॅगमधून लांबविण्यात आले. ही घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील महिला पतीच्या उपचारासाठी नागपुरात आली होती. तिच्याजवळची सव्वादोन लाख रुपयाची बॅग चोरट्यांनी उडवली. अर्चना शेडामे असे पीडित महिलेचे नाव आहे.

पतीच्या उपचारासाठी नागपूरच्या एम्स हॉस्पिटल येथे आल्या होत्या. गणेशपेठ बस स्थानकावर ई-रिक्षाने पोहोचल्या. ट्रॅव्हल्स बसमध्ये बसून तिकीट काढत असताना त्याच्या बॅगमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली.

दोन लाख 29 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. शेडमे यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत. अशी माहिती गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूराव राऊत यांनी सांगितलं.

या गरीब महिलेने आपल्या जवळ असलेली मेहनतीची पुंजी पतीच्या उपचारासाठी घेऊन आली. मात्र चोरट्याने त्यावर हात साफ केल्याने आता पतीचा उपचार कसा करायचा या विवंचनेत महिला आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. पण, ही शोधमोहीम किती दिवसात फत्ते होते, काही सांगता येत नाही.