Nagpur Crime गिट्टीखदानमध्ये चोरांची दहशत, वृद्ध महिलेचे हातपाय बांधले, दागिने घेऊन पळाले

| Updated on: Dec 04, 2021 | 2:25 PM

अनिता यांनी दार लावून घेतले आणि झोपल्या. शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास सात ते आठ आरोपी दार तोडून आत शिरले. त्यांनी विळा, पेचकसचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

Nagpur Crime गिट्टीखदानमध्ये चोरांची दहशत, वृद्ध महिलेचे हातपाय बांधले, दागिने घेऊन पळाले
gittikhadan
Follow us on

नागपूर : सैन्यदलातील एका अधिकार्‍याच्या घरात घुसून दरोडेखोरांनी वृद्ध महिलेचे हात बांधले. त्यांच्या अंगावरील दागिने लुटून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे गिट्टीखदान हद्दीत दाभा येथे घडली. यामुळं या परिसरात दहशत पसरली आहे. अनिता प्रभाकर मेश्राम असं वृद्ध महिलेचं नाव आहे.

अनिता (वय 72 वर्षे) या दाभा येथील वेलकम सोसायटीत राहतात. त्यांचा मुलगा सैन्यदलात कार्यरत आहे. घराच्या बाजूला अनिता यांची मुलगी तिच्या कुटुंबीयांसह राहते. आईला गुरुवारी रात्रीचे जेवण दिल्यानंतर मुलगी निघून गेली. अनिता यांनी दार लावून घेतले आणि झोपल्या. शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास सात ते आठ आरोपी दार तोडून आत शिरले. त्यांनी विळा, पेचकसचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

कपाटातील सोन्याचांदीचे दागिने लुटले

अनिता यांचे हात बांधून बुरखाधारी आरोपींनी त्यांच्या गळा, कान तसेच हातातील सोन्याचे दागिने काढून घेतले. दरोडेखोरांनी घर अस्तव्यस्त करून 11 हजार रुपये आणि कपाटातील सोन्याचांदीचे दागिने घेऊन पळ काढला. त्यानंतर वृद्ध अनिता यांनी स्वत:च स्वत:ची सोडवणूक करून बाजूला राहणार्‍या मुलीचे घर गाठले. गिट्टीखदान पोलिसांनाही माहिती देण्यात आली. त्यानंतर उपायुक्त विनिता साहू, ठाणेदार गजानन कल्याणकर आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले.

दरोडेखोरांना शोधण्याचे काम सुरू

पोलिसांनी दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी शहरातील सीमांवर नाकेबंदी केली. ठसे तज्ज्ञ तसेच श्‍वानपथक बोलवून घेतले. पोलिसांनी शोधमोहीम राबवून दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. अशाचप्रकारे 29 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास अज्ञात चार दरोडेखोरांनी ठाकरे ले आऊट, दाभा येथील सागर विष्णू खर्चे (30) या वायुसेना कर्मचार्‍याच्या घरी दरोडा घातला रहोता. तीन हजारांचे मंगळसूत्र लुटून नेले होते. त्यामुळं या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Nagpur बाबासाहेबांबद्दल राज्य सरकार उदासीन? साहित्य धोरण मारक असल्याची धर्मपाल मेश्राम यांची टीका

Nana Patole : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत एकमत, अधिवेशनानंतर होणार महामंडळ वाटप