Nagpur RTO | वाहन नोंदणी व नूतनीकरणाचे नवीन दर 1 एप्रिल लागू होणार, जाणून घ्या नवे दर

| Updated on: Jan 14, 2022 | 4:06 PM

नवीन चारचाकी वाहनाचे नोंदणी शुल्क सहाशे रुपये व जुन्या चारचाकीचे पाच हजार रुपये आकारण्यात येतील. नवीन तीनचाकी व ऑटोरिक्षाच्या नोंदणीचे शुल्क सहाशे रुपये असेल तर याच जुन्या वाहनाचे शुल्क दोन हजार आकारण्यात येतील.

Nagpur RTO | वाहन नोंदणी व नूतनीकरणाचे नवीन दर 1 एप्रिल लागू होणार, जाणून घ्या नवे दर
नागपुरातील आरटीओ कार्यालय
Follow us on

नागपूर : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या नव्या अधिसूचनेत नवीन वाहनांची नोंदणी व जुन्या नोंदणीच्या नूतनीकरणाचे सुधारित दर जाहीर करण्यात आले आहेत. सदरहू नियम 1 एप्रिलपासून अमलात येतील. नव्या अधिसूचनेत केंद्रीय मोटार कायद्यात करण्यात आलेल्या नव्या तरतुदींनुसार नवीन वाहन नोंदणी व जुन्या वाहनाच्या नोंदणीचे नूतनीकरण या दोहोंच्या दरांत लक्षणीय तफावत ठेवण्यात आली आहे. नवीन मोटारसायकल नोंदणी शुल्क तीनशे रुपये तर जुन्या मोटारसायकलीच्या नोंदणीच्या नूतनीकरणाचे शुल्क रुपये एक हजार असे आहे. नवीन चारचाकी वाहनाचे नोंदणी शुल्क सहाशे रुपये व जुन्या चारचाकीचे पाच हजार रुपये आकारण्यात येतील. नवीन तीनचाकी व ऑटोरिक्षाच्या नोंदणीचे शुल्क सहाशे रुपये असेल तर याच जुन्या वाहनाचे शुल्क दोन हजार आकारण्यात येतील. अवजड माल वा प्रवासी वाहनाचे नोंदणी शुल्क एक हजार पाचशे असेल.

वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट

अधिसूचनेत पंधरा वर्षाहून जुन्या वाहनांकरिता बंधनकारक असलेल्या फिटनेस सर्टिफिकेटचे दरपत्रक देखील जाहीर करण्यात आले. पंधरा वर्षाहून जुन्या साध्या दुचाकीचे 400 व स्वयंचलित दुचाकीचे 500 रुपये आकारण्यात येतील. वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट हा वाहतूक वाहनांसाठी मोठा विषय आहे. वाहतूक वाहने (माल अथवा प्रवासी ) फिटनेस सर्टिफिकेटसाठी तीनचाकी व ऑटोरिक्षा 3 हजार रुपये हलकी वाहने 7 हजार रुपये, माध्यम (माल वा प्रवासी) 1 हजार रुपये, अवजड (माल वा प्रवासी) 12 हजार रुपये असे दर आकारण्यात येतील.

तर विलंब शुल्कही लागणार

शिवाय, प्रवासी वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेट कालावधी समाप्तीनंतर प्रति दिवस 50 रुपये प्रमाणे विलंब शुल्क देखील लागू असेल. नवीन नोंदणी व जुन्या नोंदणीचे नूतनीकरण आणि फिटनेस सर्टिफिकेटचे नवीन दरपत्रक केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित वरदान यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यातर्फे प्रसिद्धी करीता देण्यात आले.

Nagpur School | सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध, शिक्षणाची जिम्मेदारी घेणार कोण ?, प्रा. सचिन काळबांडे म्हणतात…

MLA Shweta Mahale | आमदार श्वेता महाले यांचा रुद्रावतार, बँकेच्या व्यवस्थापकास झापले; कसा झाला शेतकऱ्यांचा फायदा?

Nagpur | कोरोनाने आणले बंधन! मंगल कार्यालयात व्हिडीओ शुटिंग अनिवार्य; मेयो-मेडिकलमध्ये फेस शिल्डचा वापर