AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावजी मटणावरचं ते विधान तुकाराम मुंढेंना भोवणार? प्रचंड रोष; हलबा समाज रस्त्यावर

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'सावजी मटण खाल्ल्यास महिनाभर आजारी पडेन' असे विधान केले. त्यामुळे नव्या वादाला फोडणी बसली आहे.

सावजी मटणावरचं ते विधान तुकाराम मुंढेंना भोवणार? प्रचंड रोष; हलबा समाज रस्त्यावर
tukaram mundheImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 6:04 PM
Share

सावजी मटण खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन, असं विधान अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं होतं. या विधानामुळे मुंढे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या विधानावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सावजी मटण ही केवळ पाककृती नाहीये, तर ती वैदर्भीय खाद्य संस्कृती आहे, असं म्हणत वैदर्भीयांनी मुंढे यांच्यावर हल्ला चढवला आहे. मुंढे यांच्या या विधानाच्या विरोधात हलबा समाज रस्त्यावर उतरला असून त्यांनी मुंढे यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे.

तुकाराम मुंढे यांनी अमरावतीत आल्यावर नागपुरी सावजी विषयी विधान केलं होतं. सावजी खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर सावजी (हलबा) समाजाने निषेध नोंदवला आहे. हलबा समाजाने आज रस्त्यावर उतरून तुकाराम मुंढे यांचा निषेध नोंदवला आहे.

कुणाला मना केली नाही

दरम्यान, नागपुरी सावजीबाबत रोष व्यक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी त्यावर आज पुन्हा प्रतिक्रिया व्यकत् केली होती. आपल्या विधानावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी अमरावती येथील कार्यक्रमात हे विधान केलं होतं. सावजी खाल्लं तर मी आजारी पडेन असं म्हटलं होतं. हे खरं आहे. पण, इतर कोणी खा किंवा खाऊ नका, असं मी म्हटलेलं नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले. यावेळी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच सावजी खाल्ल्याचा किस्साही सांगितला.

माफीचा प्रश्नच नाही

एकदा माझ्या मित्राने मला जबरदस्ती सावजी खायला नेलं होतं. त्यावेळी त्याचा रंग आणि तेल मी पाहिलं. केवळ एकच घास खाल्ला आणि उठलो. त्यामुळे मी फक्त माझ्या बाबत वक्तव्य केलं होतं. माफी मागायचा काही प्रश्नच नाही, असंही त्यांनी सांगितलं.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दरम्यान, तुकाराम मुंढे यांचं हे विधान असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच त्याबाबतचे मिम्सही व्हायरल होत आहेत. तसेच तुकाराम मुंढे यांच्या या व्हिडिओवर अनेक पोस्ट येत आहेत. काही पोस्टमध्ये तर चला सावजी खाऊ असं म्हटलंय. त्यामुळे सोशल मीडियावर सावजी मटण हा ट्रेंड सुरू झाला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी