Nagpur : व्वा नागपूरकर, मानलं तुम्हाला, गर्भनिरोधक म्हणून कंडोमचा वापर करण्यात टॉपवर, विदर्भाचा खास पॅटर्न

| Updated on: May 11, 2022 | 4:30 PM

कुटुंब नियोजनासाठी गर्भनिरोधक साधनांचा वापर करावा लागतो. यात राज्यात नागपूर जिल्हा कंडोमचा वापर करण्यात टॉपवर आहे. विदर्भातील पाच जिल्हे राज्यात समोर असल्याचंही सर्व्हेतून समोर आलंय. आता हा विदर्भाचा खास पॅटर्न चर्चेत आलाय.

Nagpur : व्वा नागपूरकर, मानलं तुम्हाला, गर्भनिरोधक म्हणून कंडोमचा वापर करण्यात टॉपवर, विदर्भाचा खास पॅटर्न
गर्भनिरोधक म्हणून कंडोमचा वापर करण्यात नागपूरकर राज्यात टॉपवर
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : नॅशनल फॅमिली हेल्थनं (National Family Health) एक सर्व्हे केला. या सर्व्हेनुसार, नागपूर जिल्ह्यात गर्भनिरोधक साधनांचा (Contraceptives) वापर राज्यात टॉपवर आहे. 2016 ला एक सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार, विदर्भातील 11 जिल्ह्यात गर्भनिरोधक वापर करणाऱ्यांची संख्या 72 टक्के होती. नवीन रिपोर्टनुसार 78 टक्के लोकं गर्भधारणा थांबविण्यासाठी कंडोमचा वापर करतात. राज्यात नागपूरचा क्रमांक अव्वल आलाय. नागपूर शहरातील 84 टक्के लोकं गर्भधारणा थांबविण्यासाठी कंडोमचा वापर करतात. नागपुरात गेल्या तीन वर्षांत कंडोमचा वापर करणाऱ्यांची संख्या दुपटीनं वाढलीय. तीन वर्षांपूर्वी कंडोमचा वापर करणाऱ्यांची संख्या 7.1 टक्के होती. त्यात आता वाढ होऊन 14.1 टक्के झालीय. विदर्भाचा हा नवीनच पॅटर्न (new pattern of Vidarbha) तयार झालाय. विदर्भाचा विचार केल्यास कंडोमचा वापर करणाऱ्यांची संख्या तीन टक्के वाढली आहे.

शहरी भागात कंडोमचा वापर जास्त

राज्यात 2016 मध्ये कंडोमचा वापर सात टक्के होता. त्यात आता वाढ झाली आहे. 2021 मध्ये कंडोमचा वापर 10.2 टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात कंडोमचा वापर दुप्पट केला जातोय. शहरी भागात 14.1 टक्के कंडोमचा वापर केला जातो, तर ग्रामीण भागात 7.1 टक्के कंडोमचा वापर केला जातो. गर्भनिरोधक गोळ्या घेण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. 2016 मध्ये गर्भनिरोधक गोळ्या 2.4 टक्के घेतल्या जात होत्या. त्या 2021 मध्ये 1.8 टक्के घेतल्या जात असल्याचं सर्व्हेतून स्पष्ट करण्यात आलंय.

शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कंडोमचा वापर वाढला

गर्भधारणा थांबविण्यासाठी आधुनिक पद्धतीनं कंडोमचा वापर वाढलाय. मोठ्या शहराव्यतिरिक्त छोट्या शहरातील लोकंही कंडोमचा वापर करू लागलेत. राज्यात कुटुंब नियोजनासाठी कंडोम किंवा गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो. परंतु, या गोळ्या खाण्याचं प्रमाण कमी झालंय. आधी 2016 मध्ये 2.4 टक्के महिला गोळ्या खात होत्या. आता हे प्रमाण 1.7 टक्क्यांवर आलंय. लग्नानंतर गर्भधारणा थांबविण्यासाठीच नव्हे तर लग्नापूर्वी सेक्ससाठीही कंडोमचा वापर वाढल्याचं सर्व्हेतून समोर आलंय. गर्भनिरोधक गोळ्यांएवजी कंडोमचा वापर तीन टक्क्यांनी वाढल्याचं दिसून येतं. गर्भनिरोधकांमध्ये कंडोम, खायच्या गोळ्या याशिवाय कॉपर, टी, मल्टिलोड या साधनांचाही वापर करण्यात येतो. ही नियमितपणे वापरायची असतात. पण, गर्भधारणा हवी असल्यास बंद करावी लागतात.

हे सुद्धा वाचा

नागपूर पाठोपाठ चंद्रपूर, वर्धा

कुटुंब नियोजनासाठी गर्भनिरोधक साधनांचा वापर करावा लागतो. यात राज्यात नागपूर जिल्हा सर्वाधिक समोर असल्याचं सर्व्हेतून दिसून आलं. विदर्भातील पाच जिल्हे राज्यात समोर असल्याचंही सर्व्हेतून समोर आलंय. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या अहवालानुसार, राज्यात गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्याचे प्रमाण 66 टक्के आहे. विशेष म्हणजे पहिल्या पाचमध्ये विदर्भातील जिल्हे आहेत. यामध्ये नागपूर सर्वात समोर आहे. नागपुरात गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्यात 84 टक्के प्रमाण आहे. चंद्रपूर 80 टक्के, तर वर्धा व अमरावतीचेही प्रमाण बऱ्यापैकी आहे.