Wardha | धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या जेवणात सापडल्या अळ्या, वाचा कुठल्या वसतिगृहातील आहे हा प्रकार?

| Updated on: Dec 11, 2021 | 1:35 PM

एक दिवसानंतर जेवणात अळ्या निघत असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झालाय. गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार घडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. मेस व्यवस्थापककडे तक्रार केल्यानंतरही कोणतीच कारवाई न झाल्याने विद्यार्थी संतप्त झालेत.

Wardha | धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या जेवणात सापडल्या अळ्या, वाचा कुठल्या वसतिगृहातील आहे हा प्रकार?
सावंगी मेघे येथील वसतिगृहातील नास्त्यात सापडल्या अळ्या.
Follow us on

नागपूर : वर्ध्यात विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि नास्त्यात अळ्या सापडल्याचा प्रकार समोर आलाय. सावंगी मेघे येथील सरस्वती मुलींच्या वसतिगृहातील हा धक्कादायक प्रकार आहे. दररोज जेवणात अळ्या निघत असल्यानं विद्यार्थाना उपाशी राहावं लागतंय.

मेस व्यवस्थापकांकडे तक्रार

एक दिवसानंतर जेवणात अळ्या निघत असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झालाय. गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार घडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. मेस व्यवस्थापककडे तक्रार केल्यानंतरही कोणतीच कारवाई न झाल्याने विद्यार्थी संतप्त झालेत.

शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी

या वसतिगृहात ANM, GNM, B.Sc आणि फार्मसीचे शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी आहेत. सावंगी मेघे येथील सरस्वती वसतिगृहात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी विदर्भातून येतात. 6,450 रुपये प्रति महिना जेवणाचा खर्च होतो. सोयी सुविधेच्या नावांवर विद्यार्थांना अळ्यांचे जेवण आणि नास्ता मिळत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये वसतिगृह प्रशासनाविरोधात चांगलाच रोष दिसून येतोय.

Yavatmal | मुंगोली हादरले, घरांना का पडल्या भेगा? घरांची छपरं कशी उडतात! वाचा…

Nagpur | पूर्व विदर्भात का व्हावेत वनोपज प्रक्रिया उद्योग? विभागीय आयुक्तांनी सांगितले कारण

Nagpur MLC voting | 560 पैकी 554 मतदारांनी केले मतदान, एक ठरला अपात्र; कौल कुणाच्या बाजूनं?