Arvind Kejriwal | सत्तेसाठी नव्हे देश वाचविण्यासाठी आलो, केजरीवाल यांची नागपुरात घोषणा; शिक्षणाचे दिल्ली मॉडल काय?

| Updated on: May 08, 2022 | 5:52 PM

केजरीवाल म्हणाले, शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरुवातीला टेंशन फ्री केले जाते. त्यासाठी सुरुवातीचे 45 मिनिटे मेडिटेशन करायला लावले जाते. स्टोरीज ऐकविल्या जातात. विद्यार्थ्यांना अॅक्टिव्हीटी दिल्या जातात.

Arvind Kejriwal | सत्तेसाठी नव्हे देश वाचविण्यासाठी आलो, केजरीवाल यांची नागपुरात घोषणा; शिक्षणाचे दिल्ली मॉडल काय?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नागपुरात सभा
Image Credit source: twitter
Follow us on

नागपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज नागपुरात आहेत. लोकमतनं आयोजित कार्यक्रमात आम आदमी पार्टीचा 2024 मध्ये काय रोल असणार हे ते समजावून सांगत आहेत. केजरीवाल नागपुरात म्हणाले, आम्ही सत्तेसाठी आलो नाही, तर देश वाचवण्यासाठी आलो आहोत. यावेळी त्यांनी दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्याचा मॉडल काय आहे, ते समजावून सांगितला. केजरीवाल म्हणाले, दिल्लीच्या सरकारी शाळेत (Delhi Government Schools) शिकणारे साडेचारशे विद्यार्थी आयआयटीमध्ये गेलेत. मेडिकलमध्ये काही विद्यार्थी जातात. त्यासाठी दिल्ली सरकारनं आधी प्रयत्न केले. सरकारी शाळांच्या शानदार बिल्डिंग बनविल्या. टीचर्स नियुक्त केले. लंडन, स्वित्झर्लंड, सिंगापूर येथे शिक्षकांना प्रशिक्षणासाठी (Teacher Training) पाठविले. आयआयएम अहमदाबाद ( IIM Ahmedabad) येथे प्रशिक्षणासाठी पाठविले.

हॅपिनेस स्कूलची संकल्पना

केजरीवाल म्हणाले, शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरुवातीला टेंशन फ्री केले जाते. त्यासाठी सुरुवातीचे 45 मिनिटे मेडिटेशन करायला लावले जाते. स्टोरीज ऐकविल्या जातात. विद्यार्थ्यांना अॅक्टिव्हीटी दिल्या जातात. या दिल्लीतील हॅपिनेस क्लासेसची चर्चा अमेरिकेत गेली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीनं म्हटलं की, दिल्लीतील शाळांमधील हॅपीनेस क्लास अटेंट करायचंय. त्या म्हणाल्या, केजरीवालच्या शाळेत जाणार. दीड तास क्लासमध्ये त्या बसल्या. हॅपिनेस स्कूल खासगी शाळा शिकत आहेत.

व्यावसायिक शिक्षण

आपली शिक्षण पद्धती इंग्रजांनी बनवली होती. तीच पद्धती सुरू होती. नोकरी मिळत नव्हती. यावर समाधान काढला. आंतरप्रेनरशीप क्लासेस सुरू केल्या. दिल्लीत आता आठवी, नववीत व्यवसाय करायला शिकवितो. प्रत्येक मुलाला व्यवसायासाठी दोन हजार रुपये दिले जातात. पाच मुलं दहा हजार रुपयांत बिझनेस आयडिया क्रियट करतात. त्यातून ते व्यवसाय करतात. अशा दिल्लीत 52 हजार टीम तयार आहेत. चांगल्या कल्पना असलेल्या व्यवसायिकांना श्रीमंतांशी भेट करवून दिली जाते. श्रीमंतांना कल्पना पसंत आल्या की, ते त्या व्यवसायात गुंतवणूक करतात, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.

हे सुद्धा वाचा