Nagpur Smart City : स्मार्ट सिटी सल्लागार मंडळाच्या बैठकीत ठरलं काय? 100 युनिट्स ई-टॉयलेट्स उभारणार, आणखी बरचं काही…

| Updated on: Jun 30, 2022 | 10:59 PM

नागपूर शहरातील कचऱ्याचे ब्लॅक स्पॉटचे निर्मूलन करण्यासाठी आय.सी.टी. आधारित 400 स्मार्ट कचरा कुंड्या 200 ठिकाणी लावण्यात येणार आहेत. कचऱ्या कुंडीमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या टाकण्याची सुविधा राहणार आहे. तसेच कचरा कुंडी भरल्यावर याची सूचना अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये नोंद केली जाईल.

Nagpur Smart City : स्मार्ट सिटी सल्लागार मंडळाच्या बैठकीत ठरलं काय? 100 युनिट्स ई-टॉयलेट्स उभारणार, आणखी बरचं काही...
स्मार्ट सिटी सल्लागार मंडळाच्या बैठकीत ठरलं काय?
Follow us on

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्मार्ट सिटी सल्लागार मंडळाची बैठक बुधवारी पार पडली. नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. (Radhakrishnan) बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे (Chinmay Gotmare) बैठकीचे संयोजक होते. चिन्मय गोतमारे यांनी बैठकीत उपस्थित नागपूर स्मार्ट सिटीतर्फे पेन सिटी आणि ए.बी.डी. क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती दिली. गोतमारे म्हणाले, नागरिकांच्या सोयीसाठी स्मार्ट सिटीतर्फे 50 विविध जागांवर महिला आणि पुरुषांसाठी 100 युनिट्स ई-टॉयलेट्स उभारण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सुविधा असलेले ई-टॉयलेट्स नागरिकांच्या सुविधेसाठी बाजारपेठेत उभारण्यात येतील. तसेच स्मार्ट सिटीतर्फे अनाज बाजार इतवारी, गोकुळपेठ मार्केट, गांधीसागर तलाव आणि सीताबर्डी येथे मल्टिलेव्हल कार पार्किंगची (Car Parking) सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल. ही पार्किंग मेरी गो राऊंडसारखी असणार आहे आणि 500 पेक्षा जास्त दुचाकी वाहन आणि चारचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था येथे करण्यात येईल.

स्वच्छतेसाठी रोबोटची खरेदी

गोतमारे यांनी सांगितले की, नागपूरमध्ये सिवरलाईनच्या स्वच्छतेसाठी तीन रोबोटची खरेदी करण्यात येईल. या रोबोटच्या सहकार्याने छोट्या रस्त्यावरील आणि गल्लीतील सिवरलाईनची सफाई योग्य प्रमाणे होऊ शकेल. सध्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सिवर लाईन स्वच्छता करताना त्रास होतो. केंद्र शासनाने मानवाद्वारे सिवरलाईनच्या स्वच्छतेवर बंदी घातली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना या कामात त्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी रोबोट खरेदी करण्याचा महत्वाचा निर्णय स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी 40 मिडी ई-बसेस खरेदी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ही लहान मिडी बस वातानुकूलित असणार आहे. शहरातील गल्ली कोपऱ्यापर्यंत जातील. तसेच नॉन मोटोराईज्ड (motorized) ट्रान्सपोर्टला प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या 75 ठिकाणी सायकल स्टॅन्ड लावण्यात येतील.

400 स्मार्ट कचरा कुंड्या

याशिवाय नागपूर शहरातील कचऱ्याचे ब्लॅक स्पॉटचे निर्मूलन करण्यासाठी आय.सी.टी. आधारित 400 स्मार्ट कचरा कुंड्या 200 ठिकाणी लावण्यात येणार आहेत. कचऱ्या कुंडीमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या टाकण्याची सुविधा राहणार आहे. तसेच कचरा कुंडी भरल्यावर याची सूचना अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये नोंद केली जाईल. कचरा उचलला जाईल. महाराष्ट्र राज्य हमी कायद्यामध्ये नागरिकांना 49 सेवेची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी मोबाईल ॲप तयार करणार आहे. सदर ॲप महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलला सुद्धा जोडले जाईल. नागरिकांना त्यांच्या मोबाईलच्या एक क्लिकवर माहिती प्राप्त करून घेता येईल.

हे सुद्धा वाचा