काँग्रेसतर्फे राष्ट्रपतींकडं ही महत्त्वाची मागणी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं

| Updated on: Nov 21, 2022 | 5:04 PM

आता अधिक काळ या राज्यपालांना महाराष्ट्रता ठेवलं तर राज्य याला अधिक काळ सहन करणार नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

काँग्रेसतर्फे राष्ट्रपतींकडं ही महत्त्वाची मागणी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं
नाना पटोले
Follow us on

बुलढाणा – महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सूचक ट्विट केलं. तुषार गांधी यांनी सांगितलं की, सावरकर यांनी गोडसे यांना बंदुक पुरविली. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांना वयाच्या पंचविसाव्या वर्षी शहीद व्हावं लागलं. इंग्रजांच्या प्रलोभनात ते पडले नाहीत. सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र राहुल गांधी यांनी दाखविलं. महिन्याची साठ रुपये पेन्शन सावरकर यांना मिळायची. ती कशाबद्दल मिळायची याचा उल्लेख त्याठिकाणी झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्द्लचे अपशब्द हे भाजपकडून काढले जात आहेत. यातून भाजपचा खरा चेहरा देशासमोर आलाय. सावरकरांवरील चुका लपविण्यासाठी त्याचा आरोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लावण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाचवेळी औरंगजेबाला माफी मागितली, असा उल्लेख भाजपकडून करण्यात आला. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा अधिकारी भाजपला कुणी दिला, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सत्तापिपासू आहेत. त्यामुळं ते राजीनामा देणार नाहीत. पण, सत्तेतील आमदारांनी शिवाजी महाराजांसाठी राजीनामा दिला पाहिजे. यातून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे, असंही ते म्हणाले.

राज्यभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता. बिनामेंदूचे राज्यपाल यांनी आधी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले नि आता छत्रपती शाहू महाराज यांचा अपमान करतात. राष्ट्रपती महोदयांनी राज्यपाल कोश्यारी यांना हटविले पाहिजे, अशी काँग्रेसनं मागणी केली आहे.

शेगावात मुलींनी राज्यपालांच्या पुतळ्याचं दहन केलं, हे आपण पाहिलं. आता अधिक काळ या राज्यपालांना महाराष्ट्रता ठेवलं तर राज्य याला अधिक काळ सहन करणार नाही, असंही नाना पटोले म्हणाले.