नानाजी देशमुख यांची आज पुण्यतिथी, भारतरत्न पुरस्काराने करण्यात आले होते सन्मानित

| Updated on: Feb 27, 2022 | 6:43 AM

सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी त्यांना संघाच्या प्रचारासाठी गोरखपूर येथे पाठविले. त्यानंतर त्यांना उत्तरप्रदेशात प्रांत प्रचारक बनविले. नानाजी देशमुख हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रवादी विचाराने प्रेरित झाले. समाजसेवेत त्यांची रुची वाढली.

नानाजी देशमुख यांची आज पुण्यतिथी, भारतरत्न पुरस्काराने करण्यात आले होते सन्मानित
भारतरत्न नानाजी देशमुख.
Image Credit source: सेवागाथा
Follow us on

नानाजी देशमुख यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव चंडिकादास अमृतराव देशमुख असे होते. त्यांचा मृत्यू 27 फेब्रुवारी 2010 रोजी झाला. ते एक समाजसेवक होते. ते भारतीय जनसंघाचे नेते होते. 1977 मध्ये जनता पक्षाची सरकार बनली. तेव्हा मोरारजी यांच्या मंत्रीमंडळात त्यांना सहभागी करण्यात आले. परंतु, त्यांनी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीनं सरकारच्या बाहेर राहून सेवा द्यावे म्हणून मंत्रीपद नाकारले. ते शेवटच्या क्षणापर्यंत दीनदयाल शोध संस्थानाअंतर्गत चालणाऱ्या विविध प्रकल्पांत सेवा देत राहिले. अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) सरकारने त्यांना राज्यसभेवर बोलाविले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, आरोग्य (Education, Health) आणि स्वावलंबनाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. 2019 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने (Bharat Ratna Award) सन्मानित करण्यात आले.

समाजसेवेत होती रुची

नानाजी यांचा जन्म महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील कडोली येथे एका ब्राम्हण कुटुंबात झाला. बालवयातच त्यांचे आईवडील गेले. मामांनी त्यांचे संगोपण केले. लहानपणी शाळेची शुल्क देण्यासाठी तसेच पुस्तकं खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे राहत नव्हते. परंतु, शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा होती. भाजीपाला विकून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. मंदिरात राहून पिलानी येथील बिरला इंस्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले. 1930 च्या दशकात ते संघात सहभागी झाले. महाराष्ट्रात जन्म झाला असला तरी त्यांची कर्मभूमी ही उत्तर प्रदेश राहिली. त्यांची संघाप्रती असलेली श्रद्धा पाहून सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी त्यांना संघाच्या प्रचारासाठी गोरखपूर येथे पाठविले. त्यानंतर त्यांना उत्तरप्रदेशात प्रांत प्रचारक बनविले. नानाजी देशमुख हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रवादी विचाराने प्रेरित झाले. समाजसेवेत त्यांची रुची वाढली.

जन्म महाराष्ट्रातील, कर्मभूमी उत्तरप्रदेश

1947 मध्ये संघाने राष्ट्रधर्म, पांचजन्य साप्ताहिक काढायचं ठरविलं. नानाजी देशमुख यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. नानाजी देशमुख यांच्या नेत्तृत्वात उत्तरप्रदेशात जनसंघाने मोठं काम केलं. उत्तरप्रदेशात नानाजी देशमुख यांच्या संघटन कौशल्यामुळं जनसंघाची ताकद वाढली. नानाजी हे विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनातही सहभागी झाले. दोन महिने ते विनोबांजींबरोबर राहिले. जनता पक्षाच्या संस्थापकांमध्ये नानाजी देशमुख प्रमुखांपैकी एक होते. 1980 मध्ये वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी राजकीय सन्यास घेतला. त्यानंतर त्यांनी आपले जीवन सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले. चित्रकूटमध्ये ग्रामोदय विश्वविद्यालयाची स्थापना केली. त्याचे पहिले कुलगुरू नानाजी देशमुख होते. ग्रामीण उत्थानाचे कार्य काय असते. ते आजही आपल्याला चित्रकूट येथे पाहावयास मिळते.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम, कच्च्या मालाच्या आयातीत अडथळे, सळईचे भाव चारच दिवसात 5 हजारांनी महागले

आज वि.वा. शिरवाडकर यांची जयंती, त्यांनी कुसुमाग्रज नाव का धारण केलं?, जाणून घ्या शिरवाडकरांचा जीवनप्रवास

ऊसतोडणी धिम्या गतीने तरीही साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच घोडदौड कायम..! कारखान्यांवर दबाव कशाचा?