
नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. यात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या या परिसरात बचावकार्य सुरु आहे. आता या दुर्घटनेदरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेदरम्यान प्रत्यक्षदर्शी पुरभाजी सरोदे यांनी दोन महिलांना विहिरीतून बाहेर काढलं. मात्र यात त्यांच्या स्वतःच्या पत्नीचा विहिरीत बडून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी पुरभाजी सरोदे यांनी थरारक घटनेचा घटनाक्रम सांगितला.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरी महिला भुईमूग निदसाठी नांदेडच्या आलेगाव येथे ट्रॅक्टर येत होता. अचानक हा ट्रॅक्टर पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळला. ट्रॅक्टर पडल्याने सात ते आठ महिलांचा मृत्यू झाला. प्रत्यक्ष पुरभाजी सरोदे यांनी दोन महिलांना बाहेर काढलं आहे. मात्र त्यांच्या स्वतःच्या पत्नीचा विहिरीत बडून मृत्यू झाला आहे.
मी दोन महिलांना वाचवलं. मात्र माझी पत्नी विहिरीत आहे. सकाळी मी गावाकडून आलो होतो. मी समोर आलो होतो, ट्रॅक्टर पाठीमागून आला. मी वर होतो. आरडाओरडा झाल्यानंतर मी विहिरीजवळ आलो. विहिरीमध्ये सगळे 11 लोक होते. विहिरीमध्ये सगळ्या सात महिला आहेत, त्यात माझी पत्नी सुद्धा आहे. माझी पत्नी मला दिसली नाही. ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्या खाली गेल्या. दगडू शिंदे यांच्या शेतात कामाला आलो होतो. हे ट्रॅक्टर मालकाचं होतं. ड्रायव्हर मी येण्याअगोदर पळून गेला, असे पुरभाजी सरोदे म्हणाले.
तर संतोष कांबळे यांच्याही पत्नीचा मृत्यू झाला आहे. माझी अठरा वर्षाची मुलगी होती, तिचं लग्न करायच होतं. माझ्या बायकोला यांनी विहिरीतून काढलं. बायकोचा डोकं फुटलं, असे संतोष कांबळे यांनी सांगितले.
नांदेड परिसरातील आलेगावमधील कांचननगर या ठिकाणी धक्कादायक घटना घडली. सकाळी 7 च्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजूर यांना हळद काढणीसाठी एक ट्रॅक्टरवरुन जात होतं. मात्र त्या ट्रॅक्टर चालकाला विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळला. या विहिरीत पाणी असल्याने अनेक महिला यात बुडाल्या. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.