AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | विरोधी पक्षनेते Devendra Fadanvis आणि काँग्रेस नेते Ashok Chavan एका व्यासपीठावर, उत्सुकता शिगेला

नांदेड | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे रविवारी प्रथमच एका व्यासपीठावर येतील. रविवारी माजी मंत्री स्व. गंगाधरराव कुंटूरकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. त्याकरिता फडणवीस नांदेड येथे मुक्कामी असतील.   शनिवारी रात्रीच फडणवीस यांचे नांदेडमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर रविवारी […]

Nanded | विरोधी पक्षनेते Devendra Fadanvis आणि काँग्रेस नेते Ashok Chavan एका व्यासपीठावर, उत्सुकता शिगेला
देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 3:20 PM
Share

नांदेड | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे रविवारी प्रथमच एका व्यासपीठावर येतील. रविवारी माजी मंत्री स्व. गंगाधरराव कुंटूरकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. त्याकरिता फडणवीस नांदेड येथे मुक्कामी असतील.   शनिवारी रात्रीच फडणवीस यांचे नांदेडमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर रविवारी कुटुंर येथील कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे असतील. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले खा.प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Chikhalikar) व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे देखील एकाच व्यासपीठावर कुंटूर येथे पहिल्यांदा एकत्र येत आहेत. नांदेड आणि एकंदरीतच मराठवाड्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण आणि भाजपचे फायर ब्रँड नेते देवेंद्र फडणवीस हे दोघे एकाच व्यासपीठावर आल्यानंतर काय-काय आरोप-प्रत्यारोप होतील, याकडे राजकीय जाणकारांच्या नजरा लागल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज नांदेड शहरात आगमन होत आहे. माजी मंत्री स्व. गंगाधरराव कुंटूरकर यांच्या स्मारकाचे लोकर्पण रविवारी 3 एप्रिल रोजी कुंटूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या करण्यात येत आहे. या निमित्त ते नांदेड मुक्कामी येत आहेत. ते नागपूर-यवतमाळ मार्गे मोटारीने आज रात्री 10 वाजता नांदेडमध्ये येतील. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील साईसुभाष निवासस्थानी त्यांचा मुक्काम राहणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर भाजपाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. त्यांचा   3 एप्रिल रोजी सकाळी भाजपा पदाधिकार्‍यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर नांदेड जिल्हा भाजपाचे संघटक सचिव गंगाधरराव जोशी यांची भेट घेतील. बी.के.हॉल श्रीनगर येथील निवासस्थानी जाऊन जोशी कुटूंबियांचे सांत्वन करणार आहेत. गंगाधरराव जोशी यांच्या पत्नीचे पुणे येथे निधन गेल्या आठवड्यात झाले होते. सकाळी 8.45 वाजता भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या भाग्यनगर येथील निवासस्थानास सदिच्छा भेट देणार आहेत. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश उर्फ बाळू खोमणे यांच्या सराफा होळी येथील निवासस्थानी जावून खोमणे कुटूंबियांचे सांत्वन करणार आहेत. बाळू खोमणे यांचे वडील मंचकराव खोमणे यांचे नुकतेच निधन झाले आहे. खोमणे कुटूंबियांचे सांत्वन केल्यानंतर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख यांच्या होळी येथील निवासस्थानास सकाळी 9.30 वाजता सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे कुंटूरकरडे प्रयाण करतील.

कुंटूर येथील कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवारी स्वर्गीय गंगाधरराव कुंटूरकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण कार्यक्रमास सकाळी 11 ते दुपारी 12.30 पर्यंत हजेरी लावणार आहेत. कुंटुर येथील कार्यक्रमानिमित्त देवेंद्र फडणवीस व काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण हे पहिल्यांदाच नांदेड जिल्ह्यात एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे देखील एकाच व्यासपीठावर कुंटूर येथे पहिल्यांदा एकत्र येत आहेत. त्यामुळे कुंटूरच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या-

भारतीय स्टार्टअप कंपन्यांना अच्छे दिन; गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 12 अब्ज डॉलर भांडवलाची उभारणी

Watermelon : उन्हाळी हंगामातील हुकमी पीक, दोन वर्षाच्या नुकसानीनंतर धाडस केलेले शेतकरी यंदा मालामाल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.