Nanded | संजय बियाणी हत्येचा तपास सीबीआयकडे द्या, भाजपचं आंदोलन, खा. चिखलीकरांचे आरोप काय?

| Updated on: Apr 20, 2022 | 2:07 PM

नांदेड शहरात 05 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तीन वर्षांपूर्वीच बियाणी यांच्यावर खंडणी मागण्यासाठी पिस्तूल रोखण्यात आले होते.

Nanded | संजय बियाणी हत्येचा तपास सीबीआयकडे द्या, भाजपचं आंदोलन, खा. चिखलीकरांचे आरोप काय?
संजय बियाणी हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची भाजपची मागणी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड: शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येला 15 दिवस उलटूनही मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे आता नांदेड पोलिसांकडून हा तपास काढून तो सीबीआयच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या (MP Pratap Chikhalikar) नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (Agitation) करण्यात आले. या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार मयत संजय बियाणी यांच्या गावातील अनेक ग्रामस्थदेखील आंदोलनात सहभागी झालेले दिसून आले.

‘नांदेड पोलीस हप्ते गोळा करण्यात मश्गुल’

नांदेडमध्ये राज्यात सर्वात जास्त मटका जुगार खेळला जातो आणि नांदेडची पोलिस हप्ते गोळा करण्यात मश्गुल आहे, अशी पोलिसांवर घणाघाती टिका खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज केली.. पुरावा म्हणून मटक्याच्या 100 चिठ्ठ्या गेल्या 10 दिवसांपासून मी जमा केले असल्याचेही चिखलीकर म्हणाले. त्यामुळे मटका आणि इतर अवैध धंदे वाढल्याने गुन्हेगारी वाढल्याचा आरोपदेखील चिखलीकर यांनी पोलिसांवर केला आहे.

05 एप्रिल रोजी बियाणींवर गोळीबार

नांदेड शहरात 05 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तीन वर्षांपूर्वीच बियाणी यांच्यावर खंडणी मागण्यासाठी पिस्तूल रोखण्यात आले होते. त्यावेळीही पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही. तीन महिन्यांपूर्वी त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले होते. त्यानंतर 05 एप्रिल रोजी नांदेडमध्ये ही हादरवून टाकणारी घटना घडली. त्यानंतर पंधरा दिवसून उलटून गेल्यानंतरही पोलिसांना अद्याप महत्त्वाचा क्लू हाती लागलेला नाही किंवा मारेकऱ्याचा शोधही लागलेला नाही.

इतर बातम्या-

मारुतीच्या लोकप्रिय कारच्या किमतीत वाढ, कच्चा माल महागल्याने परिणाम

Corona update : वाढलेल्या कोरोना केसेसमुळे दिल्ली पुन्हा निर्बंधांच्या उंबरड्यावर, मास्क न लावल्यास 500 रुपये दंड!