AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादग्रस्त गाण्यावरील डान्सनंतर गौतमी पाटीलचा आणखी एका जुन्या गाण्यावर डान्स, यंदा यात्रेत हेच गाणं वाजणार

‘चोली के पीछे क्या है’ या वादग्रस्त गाण्यावर केलेल्या डान्सनंतर आता गौतमी पाटीलचा लोकप्रिय गाण्यावर ठेका. डान्स पाहून चाहते म्हणाले यंदाची यात्रेत हेच गाणं वाजणार.

वादग्रस्त गाण्यावरील डान्सनंतर गौतमी पाटीलचा आणखी एका जुन्या गाण्यावर डान्स, यंदा यात्रेत हेच गाणं वाजणार
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 11, 2026 | 5:59 PM
Share

Gautami Patil : सध्या राज्यातील अनेक गावांमध्ये यात्रांचा हंगाम सुरू झाला असून या यात्रांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, तमाशा आणि लावणी कार्यक्रमांना मोठी मागणी असते. अशा कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याला विशेष आकर्षण असते. दरम्यान, गौतमी पाटीलचा एका लोकप्रिय गाण्यावर केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘बघ बघ आग सखे कसं गुबू गुबू वाजतय’ या गाण्यावर गौतमी पाटीलने केलेल्या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या डान्सची शैली, ऊर्जा आणि स्टेजवरील सादरीकरण पाहून चाहत्यांनी या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यात्रांमध्ये या गाण्याची चर्चा

गौतमी पाटीलच्या या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यंदाच्या यात्रांमध्ये हे गाणे मोठ्या प्रमाणात वाजणार असल्याचे म्हटले आहे. काही चाहत्यांनी तर यंदाची यात्रा या गाण्यामुळे अधिक रंगतदार होणार अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये गौतमी पाटीलने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून तिचा हा लूक प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. तिच्या स्टेजवरील आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांचा उत्साहही वाढल्याचे दिसून येते.

चाहत्यांची कार्यक्रमांना मोठी गर्दी

गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटील विविध गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. तिच्या कार्यक्रमांची राज्यभर मोठी चर्चा असते. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारो चाहते कार्यक्रमस्थळी गर्दी करतात. सोशल मीडियावरही तिच्या नृत्याचे लाखो चाहते असून तिचे व्हिडिओ वारंवार व्हायरल होत असतात.

काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलने बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या सुपरहिट गाण्यावर डान्स केला होता. त्या डान्सची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती. यामुळेच सध्या यात्रांच्या हंगामात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांची मागणी अधिक वाढली असून तिच्या ‘गुबू गुबू’ गाण्यावरच्या डान्सची जोरदार चर्चा रंगली आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.