मोदींना लसींबाबतची खूप माहिती; ते अनेक लसींवर भरभरून बोलले: आदर पुनावाला

नरेंद्र मोदी यांना लसींबाबत खूप माहिती आहे, असे आदर पुनावाला म्हणाले. (Narendra Modi Adar Poonawalla)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:16 PM, 28 Nov 2020
Narendra Modi Adar Poonawalla

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसींबाबत खूप माहिती आहे. ते अनेक लसींवर भरभरुन बोलले, असे उद्गार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी काढले. कोरोनावरील लसनिर्मितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. यावेळी मोदी आणि आदर पुनावाला यांच्यात लसींसदर्भात चर्चा झाली. त्यानंतर पुनावाला यांनी वरील उद्गार काढले. (Narendra Modi knows a lot about vaccines; Spoken on several vaccines said Adar Poonawalla)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरमला भेट दिल्यानंतर आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान काय झालं याची सविस्तर माहिती दिली. यावेळी, “नरेंद्र मोदींना लसींबाबत खूप माहिती आहे. त्यांनी संशोधक तसेच मला विविध लसींबाबत खूप सारी माहिती विचारली. ते भरभरुन बोलले,” असे पुनावाला म्हणाले.

यावेळी पुनावाला यांनी कोरोना लसीसंदर्भातही विसृत माहिती दिली. ते म्हणाले, “जगभरात एकूण लसींपैकी 50 ते 60 टक्के लसी भरतात तयार होत आहेत. आत्मनिर्भर भारत मोहिमेचा विचार करता आपण साथीरोगाशी लढण्यासाठी पुण्यातील मांजरी येथे सर्वात मोठी व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेचीही पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यात आली. यावर त्यांच्याशी सखोल चर्चा झाली,” असे पुनावाला म्हणाले. लस कधीपर्यंत तयार होईल? ही लस किती परिणामकारक असेल? दिवसाला किती लसींची निर्मिती होऊ शकते? आदी महितीदेखील मोदींनी विचारल्याचं सांगण्यात येत आहे.

जगभरात कोरोना लस निर्माण करण्यावर काम सुरु आहे. भारत देशातही अहमदाबाद, पुणे, हैदराबाद येथे कोरोना लसीवर काम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (28 नोव्हेंबर) लस निर्मिती करणाऱ्या देशातील महत्त्वाच्या संस्थाना भेटी दिल्या. हैदराबाद, अहमदाबाद येथील लस निर्मिती करणाऱ्या संस्थांना त्यांनी भेट देऊन  सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटलादेखील भेट दिली.

संबंधित बातम्या :

PM Modi Pune Visit Live Update | पंतप्रधान मोदींकडून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधील कोरोना लसीचा आढावा

Photo : कोरोनाच्या लसीची जय्यत तयारी; पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये!

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा, अनेक आजारांवरील लस निर्मितीमध्ये ‘सीरम’चं मोठं योगदान

(Narendra Modi knows a lot about vaccines; Spoken on several vaccines said Adar Poonawalla)