1/6

देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (28 नोव्हेंबर 2020) पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन शहरांचा दौरा करत आहेत.
2/6

अहमदाबाद आणि हैदराबाद येथील लस निर्मितीच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हवाईदलाच्या विमानाने लोहगाव विमानतळावर दाखल झाले.
3/6

पुण्यात कोरोना लसीवर सुरु असलेल्या संशोधनाबाबत ते माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास विमानाने पुण्यात पोहोचले आहेत.
4/6

त्यांच्या स्वागतासाठी ले.जनरल सी.पी. मोहंती, एअर कमांडर एच. असुदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी विमानतळावर उपस्थित होते.
5/6

पंतप्रधानांच्या सुरक्षिततेसाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
6/6

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधील कॉन्फरन्सिंगद्वारे शास्त्रज्ञांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर लसीची चाचणी, त्याचे वितरण या संदर्भात ते अधिक माहिती घेतील.