Nashik bus| सिटीलिंकच्या बस रस्त्यावर पार्क, चालकांची अरेरावी, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

| Updated on: Jan 11, 2022 | 3:37 PM

नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या जागेत बस उभ्या करून रहदारीचा व फिरण्याकरिता येणाऱ्या नागरिकांचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवून स्थानिक रहिवाशांसोबत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

Nashik bus| सिटीलिंकच्या बस रस्त्यावर पार्क, चालकांची अरेरावी, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
Citylink Bus, Nashik.
Follow us on

नाशिकः तपोवनरोड येथे सिटीलिंकच्या बस चक्क रस्त्यावर पार्क केल्या जातात. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व त्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक सिटी लिंकचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांना निवेदन दिले. याबाबत कारवाई न केल्यास पोलिसात तक्रार करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

नाशिक महापालिकेने नाशिकमधील नागरिकांच्या सोयीकरिता बससेवा सुरू केली. या बस उभ्या करण्याकरिता तपोवन येथील जनार्दन स्वामी आश्रमासमोरील बाजूची जागा नाशिक महापालिकेने राखीव केली. राखीव असलेली जागा रस्त्यापासून आत असल्याने सिटीलिंकचे बस कर्मचारी नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या जागेत बस उभी न करता थेट रस्त्यावर दोन्ही बाजूने बस उभ्या करतात. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी व संध्याकाळी फिरण्याकरिता निघालेल्या नागरिकांना सदर ठिकाणावरील फुटपाथ वर चालता येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागातून वाट काढत त्यांना जावे लागते.

नागरिकांना अरेरावाची भाषा

सकाळी एकाच वेळी सर्व बस बाहेर निघत असल्याने रहदारी असलेल्या औरंगाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जाम होत असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व बस उभ्या असल्याने वाहनधारकांना पुढील वाहनांचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूस बस उभ्या का केल्या, असा जाब नागरिकांनी विचारल्यास सिटीलिंकचे कर्मचारी अरेरावीची भाषा करतात. तपोवन रोडवर स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात फिरण्याकरिता येतात, असे असताना देखील सिटीलिंकचे बस कर्मचारी या ठिकाणावरून जोरात बस ने-आण करतात. याच प्रमाणे शहरातील इतर ठिकाणी सुद्धा बस जोरात चालविण्याची शर्यत यांच्यामध्ये लागलेली असते. बस जोरात नेताना बस स्थानकावर देखील बसचालक बस थांबवीत नाही, अशा तक्रारी आहेत.

बस आगाराचे स्थलांतर

नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या जागेत बस उभ्या करून रहदारीचा व फिरण्याकरिता येणाऱ्या नागरिकांचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा नोंदवून स्थानिक रहिवाशांसोबत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी शादाब सैय्यद, नितीन-बाळा निगळ, जय कोतवाल, किरण पानकर, विक्रांत डहाळे, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, संदीप खैरे, संतोष जगताप, सागर बेदरकर, विशाल डोके, राहुल कमानकर, स्वप्निल वाघ, रामेश्वर साबळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आम्ही 15 दिवसांच्या आता बस आगार नाशिकरोड येथे स्थलांतरित करू, असे आश्वासन सिटीलिंकचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिले आहे.

इतर बातम्याः

नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत, शिवसेना अन् काँग्रेस राजी होणार का?

Thief’s letter:‘सॉरी मला माफ करा’ म्हणत चोरट्याचे अफलातून पत्र, पुढे जे काही झाले ते वाचून व्हाल थक्क!

Nashik Train| नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या भुसावळ-इगतपुरी मेमूचा आज श्रीगणेशा; 18 रद्द गाड्याही आजपासून पूर्ववत