Nashik|पोर्तुगालहून आलेले दाम्पत्य बाधित; मालेगावात विदेशातून 106 जण आले, पिता-पुत्रावर उपचार सुरू

| Updated on: Dec 29, 2021 | 3:06 PM

नाशिक जिल्ह्यात सध्या सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी आहे. मात्र, या नियमाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत.

Nashik|पोर्तुगालहून आलेले दाम्पत्य बाधित; मालेगावात विदेशातून 106 जण आले, पिता-पुत्रावर उपचार सुरू
कोरोना विषाणू
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये पोर्तुगालहून आलेले दाम्पत्य कोरोनाबाधित आढळल्याने खळबड उडाली आहे. यापूर्वी माली देशातून आलेला व्यक्ती कोरोनाबाधित आढळला आहे. मात्र, त्याला ओमिक्रॉनची बाधा नाही. मात्र, आता या दाम्पत्याला ओमिक्रॉन आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात मालेगावमध्ये स्वीत्झरलॅण्डहून आलेल्या पिता-पुत्राचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांच्या संपर्कातील एका वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. या साऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. दुसरीकडे प्रशासनाने या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू केला आहे.

जिल्ह्यात 421 रुग्ण

नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या 421 रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 516 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 753 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 19, बागलाण 14, चांदवड 1, देवळा 14, दिंडोरी 17, इगतपुरी 18, मालेगाव 3, नांदगाव 2, निफाड 48, पेठ 1, सिन्नर 13, सुरगाणा 7, त्र्यंबकेश्वर 1, येवला 8 अशा एकूण 166 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 236, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 9 रुग्ण असून, असे एकूण 421 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार 690 रुग्ण आढळून आले आहेत.

नियम कडक

राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावले आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखीलउपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. या दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल, या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

इतर बातम्याः

Video| माणुसकीला काळीमा, स्मशानातच सरणाची लाकडे घेऊन तुंबळ हाणामारी; नाशिकमध्ये कवी पाठारेंच्या अंत्यसंस्काराप्रसंगी आक्रीत

Nashik| 6 नगरपरिषदांवर प्रशासक; तर 6 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात

Nashik| अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 10 लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार; कसा घ्यावा लाभ, वाचा सविस्तर…!