AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video| माणुसकीला काळीमा, स्मशानातच सरणाची लाकडे घेऊन तुंबळ हाणामारी; नाशिकमध्ये कवी पाठारेंच्या अंत्यसंस्काराप्रसंगी आक्रीत

नाशिकमध्ये लोककवी विनायक दादा पाठारे यांच्या अंत्यसंस्कारावेळी जुन्या राजकीय वादातून कार्यकर्ते आपापसात भिडल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. हे दृश्य इतके भयाण होते की, एकीकडे चिता पेटलेली आणि दुसरीकडे सरणाची लाकडे घेऊन कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केलेली.

Video| माणुसकीला काळीमा, स्मशानातच सरणाची लाकडे घेऊन तुंबळ हाणामारी; नाशिकमध्ये कवी पाठारेंच्या अंत्यसंस्काराप्रसंगी आक्रीत
लोककवी विनायक पाठारे.
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 10:31 AM
Share

नाशिकः मृत्यू आणि स्मशान खरे तर क्षणभंगुर जीवनाचे वास्तव दाखवते. आपल्याला खऱ्या अर्थाने जागे करते म्हणतात. मात्र, नाशिकमध्ये लोककवी विनायक दादा पाठारे यांच्या अंत्यसंस्कारावेळीच जुन्या राजकीय वादातून कार्यकर्ते आपापसात भिडल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. हे दृश्य इतके भयाण होते की, एकीकडे चिता पेटलेली आणि दुसरीकडे सरणाची लाकडे घेऊन कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केलेली. याप्रकरणी माजी महापौर अशोक दिवे, त्यांचे पुत्र राहुल दिवे, प्रशांत दिवे आणि पीपल्स रिपब्लिकनचे गणेश उन्हवणे, शशी उन्हवणे, अनिल गांगुर्डे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तथाकथित टेंभा मिरवणाऱ्या नेत्यांचा शहरभर निषेध व्यक्त होत आहे.

कोण आहेत पाठारे?

विनायक पाठारे यांनी आयुष्यभर आपल्या लेखनीतून अन्यायाचा प्रतिकार केला. गीत लेखन, शाहिरी, लावणी, प्रबोधनात्मक गीते रचत त्यांनी अफाट काम केले. ते नाशिकमधील समतानगरमध्ये रहायचे. सोमवारी त्यांचे निधन झाले. तेव्हा आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी अक्षरशः रांगा लावल्या. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी माणसाच्या अंगी असलेले शहाणपण तथाकथित कार्यकर्ते विसरले. खरे तर लोककवी बिरुद मिरवणारे पाठारे यांना आयुष्यभर उपेक्षा सहन करावी लागली. त्यांच्या मृत्यूनंतरही अक्षरशः सरणावर तुंबळ हाणामारी रंगल्याने या उपेक्षेसोबतच त्यांच्या देहाने इललोकीचा निरोप घेतला.

वाढदिवसाच्या फलकावरून वाद

विक्रांत गांगुर्डे यांनी लावलेले वाढदिवसाचे फलक सप्टेंबर महिन्यात दिवे यांच्या कुटुंबियांनी फाडले. यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला. विशेष म्हणजे या भांडणापूर्वीही गांगुर्डे आणि उन्हवणे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. मात्र, या मारहाणीचे अतिशय गलिच्छ अशा शिव्यांचे व्हिडिओ शहरभर आणि राज्यभर व्हायरल झाले आहेत. क्षुल्लक कारणावरून आपण कुठल्याप्रसंगी किती घाणेरडे वागू शकतो, हे यातून समोर आले. हे पाहून अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्यांना यावेळी डोक्याला हात लावावा लागला. या मारहाणीने नाशिकची उभ्या महाराष्ट्राभर छि…थू…होत आहे.

अग्निडागानंतर माथी भडकली…

लोककवी पाठारे यांच्या अंत्यसंस्कारासाठी गोदातीरावरच्या अमरधाममध्ये कार्यकर्ते एकत्र आलेले. पाठारे यांना अग्निडाग दिला आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले. ते इतके बेभान झाले होते की, त्यांनी सरणाची लाकडे उपसून हाणामारी सुरू केली. अनिल गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे आणि त्यांचे सहकारीविरुद्ध माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, जयेश सोनवणे, अनिकेत ऊर्फ पप्पू गांगुर्डे, पीपल्स रिपब्लिकनचे गणेश उन्हवणे, शशी उन्हवणे यांच्यात राडा झाला. या मारहाणीत गांगुर्डे पिता-पुत्र जखमी झाले. दोन्ही कडच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

इतर बातम्याः

रिलायन्समध्ये होणार नेतृत्वबदल; मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, कोण होणार उत्तराधिकारी?

तुझं थोडंच आयुष्य उरलंय, जगायचं असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेव, पुण्यातील विवाहितेकडे मागणी, भोंदूबाबाला अटक

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...