Nashik | स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत नवउद्योजकांना सबसिडी, काय आहे योजना, कसा घ्याल लाभ?

केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता सबसिडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नवउद्योजकांनी या सबसिडी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण विभागाने केले आहे.

Nashik | स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत नवउद्योजकांना सबसिडी, काय आहे योजना, कसा घ्याल लाभ?
स्टँड-अप इंडिया योजना.
| Updated on: Feb 08, 2022 | 7:06 AM

नाशिकः केंद्र सरकारच्या (Central Government) स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता सबसिडी (Margin money) उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नवउद्योजकांनी या सबसिडी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिकच्या जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील उद्योजकांसाठी ही योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 18 वर्षांवरील नवउद्योजकांना योजनेचा लाभ घेता येईल, असे कळवण्यात आले आहे.

नेमकी काय आहे योजना?

मोदी सरकारने 2016 मध्ये ‘स्टॅंड अप इंडिया’ या योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमातींना आणि महिला व्यावसायिकांना मदत करण्यात येते. सरकारच्या या योजनेला नागरिकांचा प्रचंड चांगला मिळाला आहे. नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर बँकेकडून स्टँण्ड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर होते. उर्वरित फ्रंट एंड सबसिडी स्वरूपात नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते. जिल्ह्यातील पात्र व इच्छुक नवउद्योजकांनी याबाबत अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण नाशिक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

योजनेचा लाभ कसा घ्यावा?

स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी शेड्युल्ड कमर्शियल बॅंकांपर्यत तीन पद्धतीने पोचता येते. 1) ज्या पात्र व्यावसायिकास कर्ज हवे आहे त्याने प्रत्यक्ष बॅंकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा. 2) ‘स्टॅंड अप इंडिया’ पोर्टल http://standupmitra.in द्वारे पात्र नागरिक अर्ज करू शकतात. 3) लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजरद्वारे सुद्धा कर्ज मिळवू शकता. ‘स्टॅंड अप इंडिया’ योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराने कोणत्याही बॅंकेचे कर्ज बुडवलेले असू नये.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील उद्योजकांसाठी ही योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 18 वर्षांवरील नवउद्योजकांना योजनेचा लाभ घेता येईल

– सुंदरसिंग वसावे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण विभाग

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली