छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका! संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजे संतापल्या, ‘त्या’ पोस्टवरुन खळबळ

| Updated on: Mar 31, 2023 | 12:15 PM

गुरुवारी संपूर्ण देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असतांना दुपारनंतर संयोगीताराजे यांनी एक पोस्ट केलीय. त्या पोस्टवर खळबळ उडाली आहे.

छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका! संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजे संतापल्या, त्या पोस्टवरुन खळबळ
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : संपूर्ण देशभरात गुरुवारी रामनवमीचा उत्साह बघायला मिळाला. याच दरम्यान अनेक जण शुभेच्छा देत असतात. पण याबाबत संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. त्यावरून खळबळ उडाली असून संयोगीताराजे यांची पोस्ट चर्चेत आली असून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. याशिवाय संयोगीताराजे यांनी यावेळी काळाराम मंदिरातील पूजाऱ्याला खडेबोल सुनावल्याचं त्यांच्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय त्यावेळी दर्शन घेतलेले फोटोही त्यावेळेला सोबत पोस्ट केले आहे.

खरंतर मागील महिण्यात संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस होता. यंदाच्या वर्षीचा वाढदिवस नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संयोगीताराजे छत्रपती या देखील नाशिकला होत्या. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच नाशिकला आल्याने विविध ठिकाणी भेटी दिल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

याच दरम्यान संयोगीताराजे छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन गेलेल्या संयोगीताराजे छत्रपती यांच्या सोबतचा घडलेला प्रसंग त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितला आहे. त्यावरून खळबळ उडाली असून सोशल मिडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

त्यामध्ये संयोगीताराजे यांनी पूजाऱ्याला छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका म्हणत सज्जड दमच भरला होता. याशिवाय वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांचा विरोध केल्यानंतर महामृत्युंजय मंत्र म्हंटले तरीही त्यांनी तिथे प्रश्न केलाच त्यानंतर संयोगीताराजे रामरक्षा म्हणत पूजाऱ्याला इतिहास सांगत ठणकावले होते.

यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे पूजऱ्याचा विरोध लक्षात आल्यानंतर संयोगीताराजे यांनी ही मंदिरे कुणी वाचवली? छत्रपती यांनीच… मग त्या घराण्यातील आम्ही वारसदार आहोत मग छत्रपतींना शिकवण्याचं धाडस करू नका म्हणून सज्जड दम भरला होता. तरी पुजारी आम्ही म्हंटलेलं कसं योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते.

या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे…असं म्हणत संयोगीताराजे यांनी खंत व्यक्त केली आहे.

रामनवमीच्या निमित्ताने संयोगीताराजे यांनी केलेली ही पोस्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत आली असून सोशल मिडियावर काळाराम मंदिरातील पुजाऱ्यावर संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये संयोगीताराजे यांनी देवाचे दर्शन घेत असतांना मध्यस्तीची गरज असू नये असं म्हणत थेट पूजाऱ्यांना इशारा दिला आहे.