अशोक खरात याचे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांना मोठा दणका, थेट कारवाई, नाशिक पोलिसांनी..

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. यादरम्यानच काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. आता अशोक खरात याचे व्हिडीओ फॉरवर्ड करणाऱ्यांवर पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.

अशोक खरात याचे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांना मोठा दणका, थेट कारवाई, नाशिक पोलिसांनी..
Ashok Kharat
| Updated on: Mar 27, 2026 | 7:33 AM

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे एका मागून एक असे सर्व कारनामे पुढे येत आहेत. खरात सध्या पोलिस कोठडीत असून एसआयटीकडून त्याची कसून चाैकशी केली जात आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. हेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी अशोक खरात याचे मोठे कारनामे विधीमंडळात उघड केले. राज्यातील अनेक भागात भोंदूची मोठी संपत्ती आहे. अशोक खरात याचे व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वच हादरले. अनेक महिला पुढे येऊन या भोंदूविरोधात तक्रारी करत आहेत. अशोक खरात याचे काही महिलांसोबतचे खळबळ उडवणारे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. असे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे अगोदरच सांगण्यात आले. तुम्ही जरी भोंदू अशोक खरात याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असाल तर आजच सावध व्हा. नाही तर तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो.

अशोक खरात याचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या 6 ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा नाशिक पोलिसांकडून दाखल करण्यात आला. या प्रकरणात अधिकचा तपास सुरू आहे. नाशिक शहर सातपूर पोलीस ठाण्यात 6 जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा दाखल झाला. ‘सिडको आणि सातपूर वॉलमन’ व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता.

खरात प्रकरणातील एकूण 8 अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे उघड झाले. पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. इतर ॲडमिन्सनीही व्हिडिओ पुढे फॉरवर्ड केल्याचा आरोप यादरम्यान करण्यात आला. हे 6 गुन्हे दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली. कारण अशोक खरात याचे अनेकांनी व्हिडीओ फॉरवर्ड केले आहेत.

सिद्धार्थ रामोशेसह रमीज शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे, साहिल सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता व आयटी ॲक्टेक व् अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरू; लवकरच अटकेची शक्यता आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी पोलिसांनी मोठा इशारा दिला आहे.

Follow Us