NashikGold:सोने 150 रुपयांनी, तर चांदी 300 रुपयांनी महाग

| Updated on: Sep 15, 2021 | 3:33 PM

नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये (Nashik) बुधवारी (15 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 47650, तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 66500 रुपये नोंदवले गेले. मंगळवारच्या तुलनेत सोन्याच्या भावात 150 आणि चांदीच्या भावात 300 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.

NashikGold:सोने 150 रुपयांनी, तर चांदी 300 रुपयांनी महाग
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये (Nashik) बुधवारी (15 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 47650, तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 66500 रुपये नोंदवले गेले. मंगळवारच्या तुलनेत सोन्याच्या भावात 150 आणि चांदीच्या भावात 300 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.

नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सराफा बाजारातील दर स्थिर आहेत. मंगळवारी (14 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम मागचे दर 47500 होते. मात्र, त्यात बुधवारी (15 सप्टेंबर) 150 रुपयांची वाढ होऊन ते 47650 वर स्थिराले. 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर मंगळवारी 45000 रुपयांवर गेले होते. बुधवारी या दरात कसलाही बदल झाला नाही. मात्र, मंगळवारी किलोमागे 66200 रुपये असणाऱ्या चांदीत बुधवारी 300 रुपयांची वाढ होऊन, ती 66500 रुपयांवर स्थिरावली.
सोने आणि चांदीच्या या दरावर अतिरिक्त जीएसटी असेल. दरम्यान, आता आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोने

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

सोने निचांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 2.1 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,787.40 डॉलर्सवर स्थिरावला होता. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला होता.

सोने आणि चांदीच्या भावात बुधवारी थोडी तेजी पाहायला मिळाली. नाशिकच्या सराफा बाजार पेठेत बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 47650 आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर 45000 रुपये म्हणजे कालच्या तुलनेत स्थिर पाहायला मिळतील. चांदीचे दर किलोमागे 66500 रुपये आहेत.
– चेतन राजापूरकर, डायरेक्टर, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, महाराष्ट्र (24 carat gold is expensive by Rs 150, while silver is expensive by Rs 300)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये 58 गावांत एक गाव, एकच बाप्पा!

नाशिकमधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ; 2 लाख 87 हजार नावे दुबार

इगतपुरीत 5500 कोटींचा जलविद्युत प्रकल्प होणार; ‘जेएसडब्लू’ची राज्यातही 30 हजार कोटींची गुंतवणूक, 5000 नोकऱ्या मिळणार