इगतपुरीत 5500 कोटींचा जलविद्युत प्रकल्प होणार; ‘जेएसडब्लू’ची राज्यातही 30 हजार कोटींची गुंतवणूक, 5000 नोकऱ्या मिळणार

जिल्ह्यातल्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील भावली धरण परिसरात तब्बल 5500 कोटींची गुंतवणूक (investment) करून जलविद्युत प्रकल्प (hydropower project) उभारण्यात येणार आहे. त्यातून 5000 जणांना नोकरी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी जेएसडब्लू एनर्जी समूहाने पुढाकार घेतला आहे. हा समूह राज्यात इतर चार ठिकाणी तब्बल 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

इगतपुरीत 5500 कोटींचा जलविद्युत प्रकल्प होणार; 'जेएसडब्लू'ची राज्यातही 30 हजार कोटींची गुंतवणूक, 5000 नोकऱ्या मिळणार
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात गुंतवणूक करारावर सह्या झाल्या.
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 11:51 AM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील भावली धरण परिसरात तब्बल 5500 कोटींची गुंतवणूक (investment) करून जलविद्युत प्रकल्प (hydropower project) उभारण्यात येणार आहे. त्यातून 5000 जणांना नोकरी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी जेएसडब्लू एनर्जी समूहाने पुढाकार घेतला आहे. हा समूह राज्यात इतर चार ठिकाणी तब्बल 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. (Igatpuri hydropower project; 5500 crore investment, JSW invests Rs 30,000 crore in the state, 5,000 people will get jobs)

देशातील ऊर्जा क्षेत्रात बलाढ्य असणारा जेएसडब्लू एनर्जी समुहाने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. ही कंपनी राज्यातही अजून 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतच्या करारावर कंपनी मंगळवारी सह्या केल्या आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील भावली, जामडे, कालभोंडे व कोठाळे परिसरात हा महत्त्वकांक्षी जलविद्युत प्रकल्प साकारणार आहे. या वर्षी नाशिक जिल्ह्यात यापूर्वी दोन कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. रिलायन्सने दिंडोरीतल्या तळेगाव अक्राळे येथे 2100 कोटींची गुंतवणूक केली आहे. तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याच औद्योगिक वसाहतीमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. येत्या काळी महिन्यांत आणखीही काही उद्योग जिल्ह्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर चार जिल्ह्यांत प्रकल्प

कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यातही जेएसडब्यू उद्योग समूह प्रकल्प उभारणी करणार आहे. या ठिकाणी पाच हजार मेगावॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 1879 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. या चारी प्रकल्पांमध्ये जवळपास 30 हजार कोटींची कंपनी गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

नाशिकची समृद्धता लाभदायी

नाशिक जिल्ह्याची समृद्धता उद्योग समूहांना आकर्षित करून घेत आहे. निसर्गरम्य ठिकाण, मुबलक पाणी आणि उद्योगांना कमीत कमी त्रास हे प्रशासनाचे धोरण यामुळे जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात इतर दोन कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. येणाऱ्या काळात यात वाढ होणार याच शंकाच नाही. (Igatpuri hydropower project; 5500 crore investment, JSW invests Rs 30,000 crore in the state, 5,000 people will get jobs)

इतर बातम्याः

नारायण राणे यांचा जबाब पोलिस 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार

मुंबईसाठी गुड न्यूज! अप्पर वैतरणा भरले, मायानगरीचा पाणीप्रश्न मिटला!!

लई भारीः नाशिकमध्ये चक्क सोन्याचे मोदक; दर 12000 रुपये किलो

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.