मुंबईसाठी गुड न्यूज! अप्पर वैतरणा भरले, मायानगरीचा पाणीप्रश्न मिटला!!

मुंबईकरांसाठी (Mumbai) गुड न्यूज. मायानगरी (Mayanagari) आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या या बड्या शहराला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा (Upper Vaitarna) धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. मंगळवारी (14 सप्टेंबर) रोजी धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे.

मुंबईसाठी गुड न्यूज! अप्पर वैतरणा भरले, मायानगरीचा पाणीप्रश्न मिटला!!
मुंबईला पाणीपुरवठा करणारे अप्पर वैतरणा धरण भरले आहे.

मनोज कुलकर्णी, नाशिकः मुंबईकरांसाठी (Mumbai) गुड न्यूज. मायानगरी (Mayanagari) आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या या बड्या शहराला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा (Upper Vaitarna) धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. मंगळवारी (14 सप्टेंबर) हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. (Good news for Mumbai, Upper Vaitarna is full, Mayanagari’s water problem is solved)

वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला. मंगळवारी धरणाच्या तीन सांडव्याचे एक गेट उचलून 1865 क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोबतच कालव्याद्वारे 450 क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण भरले आहे. अजूनही सप्टेंबरचा पूर्ण महिना आहे. परतीचा पाऊस सुरू झालेला नाही. आगामी काळात पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हे पाहता परिसरातील धरणे काठोकाठ भरणार आहेत.

नाशिकवरही कृपा
नाशिक जिल्ह्यावर सुरुवातीला रुसलेल्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 24 पैकी 12 धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. गंगापूर धरण 98.56 भरले असून त्यातून सोमवारी यंदाच्या हंगामातील उच्चांकी 4009 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. दारणा धरणातून 7200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातूनही 23 हजार 905 क्युसकेने गोदावरी पात्रात पाणी येत आहे. या विसर्गामुळे तसेच नांदूरमधमेश्वरमधून 94 हजार 254 क्यूसेक म्हणजे तब्बल 8.146 टीएमसी पाणी गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. सध्या जायकवाडी 59.79 टक्के भरले आहे.

गोदावरीला पहिला पूर

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण , दारणा धरण, नांदूर-मधमेश्वर प्रकल्प भरत आला आहे. मुकणे, भाम, भावली, आळंदी अशी छोटी धरणे 100 टक्के भरली आहेत. पावसाचा जोर आणि भरलेली धरणे पाहता अपेक्षेप्रमाणे गोदावरी नदीला या वर्षीचा पहिला पूर आला आहे. गोदाघाट परिसरातील, रामकुंड येथील दुकाने हलविण्यात आली आहेत. नागरिकांना नदीकाठी येऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

औरंगाबादलाही दिलासा
नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरत आल्याने शहरवासीयांवरचे यावर्षीचे पाणी कपातीचे संकट मिटले आहे. अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असून, हे पाणी जायकवाडीला लाभदायक ठरणार आहे. जायकवाडीच्या धरणावर औरंगाबादचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा पाणीप्रश्न या पावसाने सुटणार आहे. विशेषतः जायकवाडीचे पाणी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहचते. त्यामुळे गोदामाय असे प्रवाहित होणे आनंददायी ठरणार आहे. (Good news for Mumbai, Upper Vaitarna is full, Mayanagari’s water problem is solved)

इतर बातम्याः 

नाशिकमध्ये सोन्याचे दर स्थिर, 10 ग्रॅममागे 47500; चांदी किलोमागे 66200 रुपयांवर

लई भारीः नाशिकमध्ये चक्क सोन्याचे मोदक; दर 12000 रुपये किलो

मालेगावचे ‘एमआयएम’चे आमदार म्हणतायत, ‘जीवाला धोका’; पोलिसात तक्रार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI