सिन्नर, निफाडने आणले जेरीस; नाशिक जिल्ह्यात 772 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

| Updated on: Oct 13, 2021 | 5:12 PM

नाशिक जिल्ह्याला सिन्नर आणि निफाड तालुक्याने अक्षरशः जेरीस आणले आहे. सध्या सिन्नर येथे 162 आणि निफाड येथे 160 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात एकूण 772 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सिन्नर, निफाडने आणले जेरीस; नाशिक जिल्ह्यात 772 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्याला सिन्नर आणि निफाड तालुक्याने अक्षरशः जेरीस आणले आहे. सध्या सिन्नर येथे 162 आणि निफाड येथे 160 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात एकूण 772 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 99 हजार 968 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये सहाने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 649 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 58, बागलाण 3, चांदवड 30, देवळा 3, दिंडोरी 18, इगतपुरी 4, कळवण 8, मालेगाव 3, नांदगाव 11, निफाड 160, पेठ 1, सिन्नर 162, त्र्यंबकेश्वर 2, येवला 69 असे एकूण 532 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 231, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 16 तर जिल्ह्याबाहेरील 8 रुग्ण असून असे एकूण 772 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 389 रुग्ण आढळून आले आहेत.

लसीकरण वाढवले

सिन्नर तालुक्यात आतापर्यंत 508 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनलॉकनंतर येथील रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आली आहे. सध्या तालुक्यातील 50 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. मात्र, दुसरीकडे सिन्नर तालुक्यात लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. त्यात 1 लाख 63 हजार 408 म्हणजे पात्र व्यक्तींपैकी 59 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 58 हजार 146 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. टक्केवारीत हे प्रमाण जवळपास 21 टक्के इतके आहे. आतापर्यंत साधारणतः 2 लाख 21 हजार 554 जणांना डोस देण्यात आला आहे. वाढते कोरोना रुग्ण पाहता हे लसीकरण वाढवण्यात येणार आहे.

विभागाला तूर्तास दिलासा

उत्तर महाराष्ट्राला कोरोनाने तूर्तास दिलासा दिला असून, विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चक्क 97.63 टक्क्यांवर गेले आहे. विभागात आजपर्यंत 9 लाख 88 हजार 397 रुग्णांपैकी 9 लाख 65 हजार 05 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत 3 हजार 560 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात 19 हजार 777 रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.63 टक्के आहे, तर मृत्युदर 2.00 टक्के इतका आहे.

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 70 लाख 68 हजार 510 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 88 हजार 397 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 09 हजार 322 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 99 हजार 896 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 778 रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 648 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11 टक्के आहे.

इतर बातम्याः

परमबीरांच्या बेनामी मालमत्तेच्या सुरस कथा; पुनमियाच्या बनावट उताऱ्याला सरकारी कचेरीतून फुटले पाय, संशयाचे धुके गडद

नाशिकमध्ये भीषण अपघात, कारची उभ्या ट्रकला धडक; दोन मॅनेजरसह मार्केटिंग प्रतिनिधी जागीच ठार