तीन जण दारू पिऊन गाडीत हवा भरायला गेले, दुकानदारासोबत वाद झाल्याने भलतेच घडले

| Updated on: Apr 30, 2023 | 1:42 PM

अश्लील शब्दात बोलायला लागले. यातून ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वाद झाला. या वादाचा शेवट अतिशय भयानक झाला.

तीन जण दारू पिऊन गाडीत हवा भरायला गेले, दुकानदारासोबत वाद झाल्याने भलतेच घडले
Follow us on

नाशिक : दुकानदार आणि ग्राहक यांच्यात कधी-कधी वाद होत असतात. या वादाचा शेवट कधीकधी अतिशय भयानक होतो. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली. बिहारमधून एक कामगार नाशिकमध्ये आला. त्याने पंक्चर दुरुस्त करण्याची दुकान लावली. त्याच्याकडे ग्राहक यायचे. हवा भरून जायचे. गाडी पंक्चर असल्यात ती दुरुस्त करायचे. तीन जण दुकानदाराकडे आले. त्यांनी गाडीत हवा भरून मागितली. पण, ते तिघेही दारू घेतलेले होते. त्यामुळे अश्लील शब्दात बोलायला लागले. यातून ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वाद झाला. या वादाचा शेवट अतिशय भयानक झाला.

दुकानदाराची भोसकून हत्या

नाशिक शहरातील टाकळी गावाकडे जाणाऱ्या तपोवन-जेजुरकर मळा रस्त्यावर तिघा मद्यपींनी वाहनात हवा भरण्याच्या किरकोळ वादातून पंक्चर दुकानदाराची भोसकून हत्या केली. गुलाम रब्बानी असे हत्या झालेल्या पंक्चर दुरुस्त करणाऱ्या दुकानदाराचे नाव आहे. तो मूळ बिहारचा रहिवासी आहे.

नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या जेजुरकर लॉन्सजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वाहनात हवा भरून दिली नाही. या कारणातून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हल्लेखोरांनी पंक्चर दुकानदाराच्या छातीत धारदार शस्त्राने भोसकून त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

दुसऱ्या एका घटनेत, उस्मानपुरा परिसरात रस्त्याच्याकडेला शांतपणे उभा असलेल्या एका श्वानाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा संतापजनक प्रकार मंगळवारी रात्री १ वाजता घडल्याची माहिती आहे.

हल्ली भटक्या श्वानास दगड मारणे, हाकलून देणे असे प्रकार वाढले आहेत. अन्नाच्या शोधात श्वान रस्त्यावर भटकताना अनेक भागांत दिसून येतात. फार कमीवेळा असे श्वान स्वत:हून हल्ला केल्याचा प्रकार शहरात घडले आहेत. मात्र, रस्त्याच्या कडेला उभा श्वानावर एका माथेफिरूने धारदार चाकूने हल्ला केला.

युवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अत्यंत निर्घृणपणे माथेफिरू श्वानाची हत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दुसऱ्या दिवशी श्वान रस्त्याच्या कडेस मृत आढळून आल्याने पेट लव्हर्समधून संताप व्यक्त करण्यात आला. अगदी शांत डोक्याने या युवकाने श्वानावर चाकूचे वार करून ठार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या माथेफिरू युवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उस्मानपुरा भागातील प्राणीमित्रांनी केली आहे.