Video | नाशिकमध्ये पेट्रोल पंपाबाहेरच Burning car चा थरार; आगीत वाहन भस्मसात…!

| Updated on: Mar 29, 2022 | 4:26 PM

गेल्या काही दिवसांपासून कार अचानक पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चालकांमध्ये चिंता वाढली आहे. ओढा गावाजवळ पेट्रोल पंपाबाहेर ही घटना घडली. जर हीच घटना पेट्रोल पंपावर घडली असती, तर मोठा अनर्थ ओढावला असता.

Video | नाशिकमध्ये पेट्रोल पंपाबाहेरच Burning car चा थरार; आगीत वाहन भस्मसात...!
नाशिक जिल्ह्यातल्या ओढा गावामध्येे पेट्रोल पंपाबाहेरच कारने पेट घेतला.
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashik) जवळच्या ओढा गावाजवळ मंगळवारी दुपारी बर्निंग कारचा (Burning car) थरार पाहायला मिळाला. गावातल्या पेट्रोल पंपाबाहेरच (petrol pump) एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. यामुळे काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. कार चालकाने तात्काळ कारमधून उडी घेत स्वतःचा जीव वाचवला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या माध्यमातून कारला लागलेली आग विझवली. पण या कारला लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. कारमधील चालकही सुखरूप आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कार अचानक पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चालकांमध्ये चिंता वाढली आहे. ओढा गावाजवळ पेट्रोल पंपाबाहेर ही घटना घडली. जर हीच घटना पेट्रोल पंपावर घडली असती, तर मोठा अनर्थ ओढावला असता. कारण पेट्रोल भरायलाही या ठिकाणी चांगली गर्दी असते. खरे तर एक मोठा अपघात होता-होता राहिला म्हणावे लागेल.

कार मागवल्या परत

जर्मन लक्झरी कार ब्रँड बीएमडब्ल्यूने इंजिनला आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन 10 लाखांहून अधिक कार परत मागवण्याची घोषणा केली आहे. या कारमध्ये खराब इंजिन व्हेंटिलेशन सिस्टीम आहे. त्यामुळे ते ओवरहीटिंगचा बळी ठरू शकतात आणि त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढू शकतो. कार निर्मात्या कंपनीने सांगितले की, रिकॉल मोहिमेमुळे यूएसमधील सुमारे 9,17,000 कार आणि SUV प्रभावित झाल्या आहेत. याशिवाय, कॅनडातील 98,000 वाहने आणि दक्षिण कोरियातील 18,000 कार देखील परत मागवण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. प्रभावित वाहनांमध्ये 2006 ते 2013 दरम्यान निर्मित अर्धा डझन BMW वाहनांचा समावेश आहे.

काय करू शकतो?

कारला आग लागण्याची घटना कधीही आणि कुठेही होऊ शकते. सध्याचे वेगवेगळे अपघात पाहता ही वेळ आपल्यावरही येऊ शकते. त्यामुळे आपण नेहमी दक्ष राहिले पाहिजे. कार वापरत असू किंवा नसू. तुम्ही स्वतः कार चालवत असाल, तर गाडी हळूहळू डाव्या बाजूला घेऊन थांबवा. स्वतः खाली उतरा. गाडीतील इतरांनाही खाली उतरायला लावा. शक्यतो गाडीजवळ जाणे टाळे. तुम्हाला शक्य असल्यास तात्काळ अग्निशमन दलाला फोन लावा. जर तुमच्या समोर अशी घटना घडली, तरी पहिल्यांदा कारमधील व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. लगेच अग्निशमन दलालाही फोन लावा. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळली जाऊ शकते.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?