निर्भया केसचा दाखला… काय आहे महाराष्ट्र हादरवणारं मालेगाव डोंगराळे प्रकरण?

मालेगावच्या डोंगराळे बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल लागला असून, कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणाचा संदर्भ देत, हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे न्यायालयाने म्हटले. अवघ्या १० महिन्यांत जलदगती न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

निर्भया केसचा दाखला... काय आहे महाराष्ट्र हादरवणारं मालेगाव डोंगराळे प्रकरण?
Malegaon Dongrale case
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 11:51 AM

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे हत्या आणि बलात्कार प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. तब्बल 10 महिन्यानंतर या प्रकरणाचा निकाल आला असून कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात निकाल देताना कोर्टाने दिल्लीच्या निर्भया केसचा संदर्भ देत हे प्रकरण किती भयावह आहे, हे स्पष्ट केलं. तसेच कोर्टाने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत आरोपीला शिक्षा सुनावली आहे. ज्येष्ठ वकील उज्जवल निकम यांनी या प्रकरणात प्रभावीपणे बाजू मांडली होती.

कोर्टात काय घडलं?

जलदगती न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. अप्पर जिल्हा न्यायाधीश के. जी. पालेदार यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. कोर्टाने या प्रकरणाचा निकाल देताना काही निरीक्षणं नोंदवली आहेत. दिल्लीच्या निर्भया केसमध्येही असंच घडलं होतं. या प्रकरणात देखील न्यायालयाने फाशीची शिक्षा दिलेली होती. तसेच निर्भयाच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून 10 लाख रुपयांची रक्कम दिली होती. त्यामुळे या प्रकरणातही फाशी लागू होते. आम्ही निर्भया केससह इतर केसेसचे ग्राऊंड चेक केले. या प्रकरणातील बालिकेचे वय पाहिले तर त्या केस आणि या केसच्या सर्व बाबी जुळतात. ही केस दुर्मिळातील दुर्मिळ आहे. त्यामुळे आरोपींना फाशी अधिक सात वर्षाच्या दोन शिक्षा सुनावण्यात येत असल्याचं कोर्टाने निकालात म्हटलं आहे.

Loading...

नेमकं काय घडलं होतं?

16 नोव्हेंबर 2025मध्ये मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातून साडेचार वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण झालं होतं. या मुलीला कॅडबरी चॉकलेटचं अमिष दाखवून पळवून नेण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. ही घटना उघड होताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनीही या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला होता. तर राज्य सरकारने हे प्रकरण जलदगती न्यायालयाकडे सोपवलं होतं. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती करण्यात आली होती.

पोलिसांनीही वेगाने तपास करत अवघ्या काही तासात आरोपी विजय खैरनार याला अटक केली होती. त्यानंतर तीन आठवड्याच्या आत त्याच्या विरोधात कोर्टात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांनी वेगाने केलेला तपास आणि वकिलांनी केलेला प्रभावी युक्तिवाद यामुळे अवघ्या 10 महिन्यातच या प्रकरणाचा निकाल आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us