AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imran Khan : त्याचं रक्त भारतीय, आवाज भारतीय… संजय राऊत यांची इमरान खान यांच्यावर पहिली प्रतिक्रिया

अभिनेता इमरान खानला मुंबई पोलिसांनी भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, "इमरानचं रक्त आणि आवाज भारतीय आहे, मग त्याला देश सोडायला का सांगता?" पोलिसांच्या या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Imran Khan : त्याचं रक्त भारतीय, आवाज भारतीय... संजय राऊत यांची इमरान खान यांच्यावर पहिली प्रतिक्रिया
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 11:19 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात भाग घेतला म्हणून अभिनेता इमरान खान याला मुंबई पोलिसांनी भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. इमरान हा अमेरिकन नागरिक असल्याने त्याला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जो या देशात काम करतो, या देशात ज्याचं शिक्षण झालं, त्याला आता देश सोडून जायला सांगण्याचं कारण काय? असा सवाल केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या प्रकरणावरून मुंबई पोलिसांना घेरलं आहे. इमरानचा आवाज भारतीय आहे. त्याचं रक्त भारतीय आहे. मग त्याला देश सोडून जायला का सांगत आहात? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.

या देशात आंदोलन करणं गुन्हा आहे असं वाटू लागलंय. इमरानचा जन्म अमेरिकेत झाला हे मी वाचलं. पण तो भारतीय आहे. त्याचे कुटुंबीय भारतीय आहे. त्याचं रक्त भारतीय आहे. त्याचा आवाज भारतीय आहे. माझ्या देशात काही होत असेल आणि त्यावर मी आवाज उठवत असेल तर तुम्ही मला भारत सोडायला सांगता? आपण ब्रिटिशांना भारत सोडायला सांगितलं होतं. ते आपल्या लोकांना भारत सोडायला सांगत आहेत. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आले होते. तेव्हा त्यांना कुणी म्हटलं नाही तुम्ही आफ्रिकन आहात. तुम्ही या देशाचे नागरिक नाही. तुम्ही देशातून चालते व्हा. जर महात्मा गांधी या देशातून गेले असते तर आज देश स्वतंत्र झाला नसता, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे.

बांगलादेशच्या निवडणूक आयुक्तांना…

काही लोकांना भारताचा बांगलादेश बनवायचा आहे, अशी टीका भाजपने केली होती. त्याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. भाजप भारताची तुलना बांगलादेशाशी करते. भाजप भारताची तुलना नेपाळशी करते. भाजप भारताची तुलना श्रीलंकेशी करत आहे. आम्ही तर भारताची तुलना रशिया आणि अमेरिकेशी करत आहोत. आणि भाजप श्रीलंका आणि बांगलादेशाशी आपल्या देशाची तुलना करत आहेत. बांगलादेशात अराजकता का पसरली? बांगलादेशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीत घोटाळा केला म्हणून लोकांनी त्यांना रस्त्यावर आणून मारलं होतं. हे भाजपला माहीत आहे का? बांगलादेशाचे निवडणूक आयुक्त तुरुंगात आहेत. हे सांगा ज्ञानेश कुमार यांना, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.

कोर्टाची माफी मागतो

दरम्यान, अवमान केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊत यांना स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावर राऊत यांनी सपशेल माफी मागितली आहे. कोर्टाचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या आयुष्यात मी कोर्टाच्या विरोधात कधी अपशब्द वापरले नाही. पण तरीही रागाच्या भरात तोंडून काही शब्द गेले असतील तर मी कोर्टाची माफी मागत आहे. मला माफी मागायला जराही खेद वाटत नाही. कारण आम्ही नेहमीच कोर्टाचा सन्मान करतो. कोर्ट देशाचं आणि संविधानाचं संरक्षक आहे. त्यामुळे कोर्टाची मी माफी मागतो, असं राऊत म्हणाले.

Follow Us
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?