AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसकडून सर्वात मोठी खेळी! पॉवरफुल नेता मैदानात उतरवला, शरद पवारांची भेट येऊन…डिलिमिटेशन बिलावेळी ऐनवेळी गेम पलटणार?

मल्लिकार्जुन खरगे आज चेन्नई आणि मुंबईच्या दौऱ्यावर असतील. ते चेन्नईत डीएमके पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांची भेट घेतील. या दोन्ही नेत्यांची भेट दुपारी दोन वाजता चेन्नईत होईल.

काँग्रेसकडून सर्वात मोठी खेळी! पॉवरफुल नेता मैदानात उतरवला, शरद पवारांची भेट येऊन...डिलिमिटेशन बिलावेळी ऐनवेळी गेम पलटणार?
sharad pawar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 29, 2026 | 10:09 AM
Share

Delimitation Bill : येत्या सोमवारी म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत सादर करणार आहे. या विधेयकावर संसदेत पुन्हा एकदा चर्चा होणार असून ते मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. तर हे विधेयक सामान्यांच्या हिताचे नाही. या विधेयकामुळे एसी, एसटी यांच्यावर अन्याय होईल, असा दावा काँग्रेस तसेच इंडिया आघाडीकडून केला जातो. विरोधी बाकावर असलेल्या शरद पवार गट आणि डीएमके हे दोन्ही पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेता आता काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे. काँग्रेसमध्ये पडद्यामागे हालचाली वाढल्या असून या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शरद पवार तसेच एम के स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.

खरगे घेणार स्टॅलिन, शरद पवार यांची भेट

पवार गट आणि डीएमके हे दोन्ही पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही पक्षांच्या खासदारांनी विधेयकाच्या समर्थनार्थ मतदाने केले तर हे विधेयक पारित होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी काँग्रेसकडून आता प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन हे डीएमकेचे प्रमुख एम के स्टॅलिन आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.

मल्लिकार्जुन खरगे आज चेन्नई आणि मुंबईच्या दौऱ्यावर असतील. ते चेन्नईत डीएमके पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांची भेट घेतील. या दोन्ही नेत्यांची भेट दुपारी दोन वाजता चेन्नईत होईल. तर खरगे रात्री मुंबईत येऊन शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीत संबंधित विधेयक सामान्यांच्या कसे हिताचे नाही, याबाबत सांगितले जाणार आहे. तसेच या दोन्ही पक्षप्रमुखांचे मन वळवण्याचा यात प्रयत्न होणार आहे. दरम्यान, आता खरगे यांना या प्रयत्नात यश येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे संसदेत आसनांची व्यवस्था बदलण्यात येत आहे. पाठिंबा देण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्या 97 खासदारांची आसनव्यवस्था बदलण्यात आली आहे. त्यामुळे विधेयक पटलावर ठेवल्यानंतर नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA चा मोठा दणका! 12 हॉटेल्ससह ब्लिंकइट...
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA चा मोठा दणका! 12 हॉटेल्ससह ब्लिंकइट स्टोअर्सचे परवाने निलंबित
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची आज महत्त्वाची बैठक!
एकनाथ शिंदेंनी जपली माणुसकी; विनोद कांबळींच्या कुटुंबाला मदतीचा हात!
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी जपली माणुसकी; विनोद कांबळींच्या कुटुंबाला मदतीचा हात!
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात