AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: सीतेच्या भूमिकेवरून झालेल्या ट्रोलिंगला साई पल्लवीचं सडेतोड उत्तर; थेट म्हणाली..

Ramayana: 'रामायण' चित्रपटातील माता सीतेच्या भूमिकेवरून साई पल्लवीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. तिच्या लूकपासून व्यक्तिरेखेपर्यंत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. आता या टीकेवर अभिनेत्रीने पहिल्यांदाच स्पष्ट प्रतिक्रिया देत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Ramayana: सीतेच्या भूमिकेवरून झालेल्या ट्रोलिंगला साई पल्लवीचं सडेतोड उत्तर; थेट म्हणाली..
साई पल्लवीImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 29, 2026 | 9:48 AM
Share

Ramayana: बॉलिवूडमध्ये सध्या ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, तर अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच साई पल्लवीच्या सीतेच्या भूमिकेतील निवडीवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा आणि टीका झाली. काहींनी तिच्या लूकवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी सीतेच्या व्यक्तिरेखेच्या सादरीकरणावर आक्षेप घेतला. आता या सर्व टीकेवर साई पल्लवीने पहिल्यांदाच स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच बरखा दत्त यांच्या ‘We The Women’ या कार्यक्रमात साई पल्लवी सहभागी झाली होती. यावेळी ‘मोजो स्टोरी’च्या माध्यमातून झालेल्या संवादात तिला सीतेची भूमिका साकारल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला आणि सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेचा ती कसा सामना करते, असे प्रश्न विचारण्यात आले.

काय म्हणाली साई?

साई पल्लवी म्हणाली की, सोशल मीडियावर तिच्याबद्दल काय बोललं जातं, याची तिला पूर्ण जाणीव आहे. सीता मातेचं सौंदर्य कसं असायला हवं, त्या कशा दिसायला हव्यात, यावर अनेकजण आपली मतं मांडतात. मात्र, अशा प्रतिक्रियांमुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होत असेल, तर स्वतःला अधिक खंबीर बनवण्याची गरज आहे, असं तिचं म्हणणं आहे. ‘लोकांची मतं ही त्यांची मतं असतात. मी स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगते. तुमच्या मनात कोणती असुरक्षितता असेल, तर आधी आतून मजबूत होणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही संपूर्ण जगाचा सामना करू शकता किंवा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकता’, अशा शब्दांत साईने आपली भूमिका मांडली.

सीतेच्या लूकवरूनही झाली होती टीका

चित्रपटातील साई पल्लवीच्या लूकवरूनही सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काही प्रेक्षकांच्या मते, माता सीतेच्या पारंपरिक प्रतिमेशी तिचा लूक जुळत नाही. अभिनेत्री दीपिका चिखलिया, ज्यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका साकारली होती, त्यांनीही साईच्या लूकबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तर अभिनेता मुकेश खन्ना यांनी सीतेला योद्ध्याच्या रूपात दाखवण्यावर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तनिषा मुखर्जीनेदेखील साईच्या कास्टिंगवर नाराजी व्यक्त केली होती.

याच मुलाखतीत साई पल्लवीने चित्रपटांमधील महिलांच्या व्यक्तिरेखांबाबतही आपलं मत मांडलं. केवळ ग्लॅमर वाढवण्यासाठी किंवा चित्रपटात सुंदर दिसण्यासाठी असलेल्या भूमिका तिला करायच्या नाहीत, असं तिने सांगितलं. एखाद्या व्यक्तिरेखेत ताकद आणि आशय असणं तिच्यासाठी महत्त्वाचं आहे. चांगल्या भूमिका मिळवण्यासाठी तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात चार ते पाच वर्षे वाट पाहिली, असाही खुलासा तिने केला. शिवाय, पडद्यावर महिलांच्या सौंदर्याबाबत असलेल्या अपेक्षांवरही तिने भाष्य केलं. पुरुष कलाकार वेगवेगळ्या वयात आणि शरीरयष्टीत पडद्यावर दिसू शकतात, मात्र महिला कलाकारांकडून कायम परिपूर्ण दिसण्याची अपेक्षा केली जाते, असं तिने नमूद केलं.

सीतेची भूमिका साकारल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला?

सीतेची भूमिका साकारल्यानंतर तिच्या आयुष्यात काही वैयक्तिक बदल झाले आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखा कलाकाराच्या मनावर काही ना काही छाप सोडते. मात्र, हे बदल पूर्णपणे वैयक्तिक असून जगाला त्याबद्दल जाणून घेण्याची गरज नाही, असंही साईने सांगितलं. दरम्यान, ‘रामायण’मधील तिच्या भूमिकेवरून सुरू असलेली चर्चा अद्याप थांबलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील टीकेला महत्त्व न देता स्वतःच्या कामावर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवण्याचा संदेश साई पल्लवीने या मुलाखतीतून दिला आहे.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची आज महत्त्वाची बैठक!
एकनाथ शिंदेंनी जपली माणुसकी; विनोद कांबळींच्या कुटुंबाला मदतीचा हात!
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी जपली माणुसकी; विनोद कांबळींच्या कुटुंबाला मदतीचा हात!
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!