Kolhapur Accident: दोन चिमुकल्यांच्या अंगावरून भरधाव कार गेली, थरकाप उडवणारा CCTV, दैव…
Kolhapur Car Accident: कोल्हापूरमध्ये रस्त्याच्या कडेला खेळणाऱ्या दोन भावांच्या अंगावरून भरधाव कार गेली. पण दैवबलवत्तर म्हणून हे दोन्ही चिमुकले या अपघातातून बचावले. या अपघाताच्या सीसीटीव्हीने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला.

Kolhapur Car Accident: कोल्हापूर रस्त्या कडेला खेळणाऱ्या शाळकरी मुलांच्या अंगावरून भरधाव कार गेली. सुदैवाने या भीषण अपघातातून दोन्ही चिमुकले बचावले. या घटनेचा CCTV समोर आला आहे. रस्त्या कडेला खेळणाऱ्या शाळकरी मुलांच्या अंगावरून ही भरधाव कार गेली. सुदैवाने या भीषण अपघातातून दोन्ही चिमुकले बचावले असले तरी, एका मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. कोल्हापूरच्या गोकुळ शिरगाव मधील सातबारा पार्क मधील थरारक घटना घडली. या अपघातात ८ वर्षीय मंथन बोडके गंभीर जखमी आहे. तर त्याच्या भावालाही किरकोळ इजा झाली आहे.
दोन्ही चिमुकले बचावले
कोल्हापूर शहरानजीकच्या गोकुळ शिरगाव येथील केआयटी (KIT) कॉलेज परिसरातील सात बारा पार्क कॉलनीत शुक्रवारी (२७ नोव्हेंबर २०२६) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला खेळणाऱ्या दोन सख्ख्या भावांच्या अंगावरून भरधाव कार गेल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने या भीषण अपघातातून दोन्ही चिमुकले बचावले असले तरी, एका मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे
सात बारा पार्क कॉलनीत चार मुले रस्त्याच्या कडेला बसून खेळत होती. त्याच वेळी वळण घेणाऱ्या एका भरधाव चारचाकी गाडीने खेळत असलेल्या मंथन बोडके (वय ८) आणि महेश बोडके (वय ६) या दोन सख्ख्या भावांच्या अंगावरून भरधाव कार गेल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने या भीषण अपघातातून दोन्ही चिमुकले बचावले
तातडीने उपचारासाठी रुग्णालयात धाव
संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गाडी अंगावरून गेल्यानंतर काही क्षणांतच दोन्ही मुले स्वतःहून गाडीखालून बाहेर आली आणि उभी राहिली या अपघातात ६ वर्षीय महेश थोडक्यात बचावला, मात्र ८ वर्षीय मंथनच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. अपघातानंतर कार चालकाने काही अंतरावर गाडी थांबवली आणि स्थानिक नागरिक, कुटुंबीय व कारमधील प्रवाशांनी मिळून मंथनला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
