IND vs NZ: मॅट हेन्रीकडून वेगवान बाउंसरचा मारा! गुरनूर ब्रारच्या थेट…मैदानात काय घडलं? पाहा Video
Gurnoor Brar Injury: भारत न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात गुरनूर ब्रारला आता दुखापतीचा सामना करावा लागला.

IND vs NZ 2nd Test: क्राइस्टचर्च कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ७२ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर एक भीतीदायक दृश्य घडले. यजमान न्यूझीलंडकडून मॅट हेन्री गोलंदाजी करत होता, तर भारताकडून गुरनूर ब्रार फलंदाजी करत होता. हेन्रीने षटकाचा पहिला चेंडू अतिशय वेगाने टाकला, जो ब्रारच्या बॅटला लागून त्याच्या कॉलरबोनला आणि मानेच्या खालच्या भागाला लागला. तो मैदानाच्या मध्यभागी वेदनेने ओरडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
फिजिओकडून दुखापतीची तपासणी
गुरनूर ब्रारला दुखापत होताच, फिजिओ तात्काळ मैदानावर पोहोचला. त्याने ब्रारच्या कॉलरबोनजवळील दुखापतग्रस्त भागाची तपासणी केली. स्थिती समाधानकारक आढळल्यावर, त्याने दुखापतग्रस्त भागावर टेप लावली. उपचार घेतल्यानंतर, तो पुन्हा फलंदाजीसाठी उभा राहिला आणि त्याने आपला डाव सुरू ठेवला. त्यानंतर त्याच्यामध्ये दुखापतीपूर्वी असलेला आत्मविश्वास दिसला नाही.
THAT’S A NASTY ONE 😳
Matt Henry comes firing after Lunch as Gurnoor Brar takes a nasty blow to the throat. 🤕
Watch the HERO VIDA India Tour of New Zealand, 2nd Test, Day 3, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.
#SonySportsNetwork #SonyLIV #NZVIND https://t.co/goh2WayPW3
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 29, 2026
मॅट हेन्रीच्या बाउन्सरने ब्रारला त्रास देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याला त्याच्याविरुद्ध संघर्ष करावा लागला आहे. कसोटी मालिकेपूर्वीच्या एकदिवसीय मालिकेतही हेन्रीने त्याला खूप त्रास दिला होता. माउंट मौंगानुई येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात, हेन्रीने त्याच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात बाउन्सरचा वापर केला. त्यानंतर त्याने यॉर्कर टाकून त्याचा ऑफ-स्टंप उडवला.
क्राइस्टचर्च कसोटीच्या पहिल्या डावात, १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना गुरनूर ब्रारने एकूण ४६ चेंडूंचा सामना केला. त्याने एका चौकारासह २१.७३ च्या स्ट्राइक रेटने १० धावा केल्या. या सामन्यात ध्रुव जुरेलने सर्वाधिक धावा केल्या. एकटा ध्रुवने या सामन्यात भारताची बाजू लढवली.
