AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana: मोठी बातमी! पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार, मोठी अपडेट काय?

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत आहे. साधारणपणे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अशा मागणीचा रेटा लावला जातो. पण यावेळी वर्षाअखेरीस याविषयीची एक अपडेट समोर येत असल्याने त्याविषयी चर्चा सुरू आहे.

PM Kisan Yojana: मोठी बातमी! पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार, मोठी अपडेट काय?
पीएम किसान योजनेचा हप्ता वाढणार, मोठी अपडेट काय?
| Updated on: Nov 28, 2026 | 1:42 PM
Share

PM Kisan Samman Nidhi: केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये मिळतात. तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. पण बी-बियाण्यांच्या वाढत्या किंमती, खत, कीटकनाशकं आणि शेतीशी संबंधित इतर साहित्य महागल्याने केंद्र सरकारकडे पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे. साधारणपणे केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अशी मागणी करण्यात येत आहे. यंदा मात्र वर्षा अखेरीस अशी मागणी समोर येत आहे.

भारतीय किसान संघाकडून मागणी

भारतीय किसान संघाने केंद्र सरकारकडे पीएम किसान योजनेसाठी बजेट वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीला विशेष महत्त्व आले आहे. संघटनेने 2027-28 वर्षासाठीच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे 17 मागण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये केवळ पीएम किसान योजनाच नाही तर सरकारी खरेदी, देशी पशूपालनाला चालना द्यावी. जैविक खताला प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात येत आहे.

पीएम किसान योजनेच्या बजेटमध्ये वाढीची मागणी

भारतीय किसान संघाने केंद्र सरकारकडे विविध मागण्यांचा प्रस्ताव दिला आहे. शेतीचा खर्च सातत्याने वाढत आहे. बी-बियाणे, खतं, किटकनाशक आणि कृषी यंत्रासाठी शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक खर्च येत आहे. अशात पीएम किसान योजनेतंर्गत मिळणारी आर्थिक मदत तुटपूंजी असल्याचा दावा भारतीय किसान संघाने केला. सध्या शेतकऱ्याला या योजनेतंर्गत वर्षाला 6,000 रुपये देण्यात येतात. अर्थात किती बजेट वाढवावे आणि हप्ता किती वाढवावा याविषयीची माहिती समोर आलेली नाही.

या लोकांना नाही मिळत योजनेचा लाभ

शेतकरी किसान योजनेच्या अटींनुसार, एखाद्या आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला योजनेचा लाभ देण्यात येत नाही. ज्यांचे निवृत्तीवेतन दरमहा उत्पन्न 10 हजार रुपयांहून अधिक असेल, केंद्र, राज्य सरकारच्या सेवेतील निवृत्ती अधिकारी अथवा कर्मचारी असल्यास अशा कुटुंबातील सदस्याला या योजनेचा लाभ देण्यात येत नाही. डॉक्टर, वकील, अभियंता, सीए अथवा व्यवसाय करणाऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात येत नाही.

Follow Us
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा....
DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा निर्णय...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हे...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण
बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे
Mumbai Megablock Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....
Pune Police : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील चुकीने उडाली खळबळ