“शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर ‘या’ दिवशी मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडकणार”; या नेत्याने थेट इशाराच दिला…

नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जामुळे शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे राजू शेट्टी यांनी बिऱ्हाड आंदोलन काढून बँकेला थेट इशारा दिला आहे. जिल्हा बँकेवर अक्षरशः दरोडा घालणारे नामानिराळे आहेत.

शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडकणार; या नेत्याने थेट इशाराच दिला...
| Updated on: Jan 17, 2023 | 12:37 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आर आणि पारची लढाई घेऊन आता रस्त्यावर उतरले आहेत. प्रश्न सोडवण्याचा निर्धार करून रस्त्यावर आलो आहे. त्यामुळे प्रश्न सुटल्याशिवाय शांत राहणार नाही असा स्पष्ट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले की, लढणाऱ्या लोकांच्या मागे समाज उभा राहतो.

त्यामुळे या आंदोलनाला अनेकांनी मदत केली आहे. सरकार आणि प्रशासनाने 2 दिवसापूर्वी पर्यंत आंदोलनाची दखल घेतली नाही.

मात्र कालपासून बिऱ्हाड आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर आणि शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा दिसल्यानंतर मात्र सगळी चक्रं फिरायला सुरुवात झाली असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जामुळे शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे राजू शेट्टी यांनी बिऱ्हाड आंदोलन काढून बँकेला थेट इशारा दिला आहे. जिल्हा बँकेवर अक्षरशः दरोडा घालणारे नामानिराळे आहेत.

तर कारवाई होऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांशी जुळवूनही घेतले जाते. तर धनदांडग्यांना कर्ज भरण्यासाठी विनंती करायची आणि शेतकऱ्यांवर मात्र कारवाई करायची ही पद्धत येथील बँकांची असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

मी दादा भुसेंना म्हटलं आहे की, तुम्ही खनिकर्म आणि बंदर. बंदर म्हणजे माकड नव्हे बंदरे मंत्री. बँकेचा विषय तुमच्या अखत्यारीत येत नाही.

तसेच जिल्हा बँकेची सक्तीची कर्जवसुलीही होणार नाही. एकरकमी तडजोडीसंदर्भात निर्णय होईपर्यंत कर्जवसुलीसाठी तगादा लावला जाणार नसल्याचे अश्वासन सहकार मंत्री दादा भूसे यांनी दिले आहे.

बिऱ्हाड आंदोलनावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, लिलाव झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही.

सरकारने दिलेले शब्द पाळले नाही, तर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर 16 फेब्रुवारीला ठाण्याला मुख्यमंत्र्यांच्या दारात सर्व शेतकरी धडकणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.