Nashik | मनमाडला मोफत हेल्मेट वाटप, पोलिस व तेल कंपन्यांचा स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त खास उपक्रम…

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे महत्वाचे आहे. मात्र, बरेच लोक हेल्मेट घालणे टाळतात. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मनमाड शहरात एक वेगळा उपक्रम राबवत दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याचे महत्व पटून देत हेल्मेटचे वाटप देखील करण्यात आले आहे.

Nashik | मनमाडला मोफत हेल्मेट वाटप, पोलिस व तेल कंपन्यांचा स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त खास उपक्रम...
| Edited By: | Updated on: Aug 13, 2022 | 9:55 AM

मनमाड : बाईकस्वारांचे वाढते अपघात (Accident) पाहता मनमाड शहरामध्ये एक खास मोहिम राबवली जातंय. शहर पोलिस व इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमानाने अमृत महोत्सवानिमित्त शहरात अपघात रोखण्यासाठी हेल्मेट (Helmet) वाटप केले जात आहे. अप्पर पोलिस अधीक्षक व मनमाड (Manmad) विभागाचे पोलिस उपअधिक्षक समिरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते व कंपनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोफत हेल्मेट वाटप उपक्रमाला सुरूवात करण्यात आली.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मनमाड शहरात खास उपक्रमाला सुरूवात

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे महत्वाचे आहे. मात्र, बरेच लोक हेल्मेट घालणे टाळतात. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मनमाड शहरात एक वेगळा उपक्रम राबवत दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याचे महत्व पटून देत हेल्मेटचे वाटप देखील करण्यात आले आहे. शहर पोलिस व इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमानाने ही मोहिम शहरात राबवण्यात आलीयं.

मनमाडच्या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. 13 आॅगस्ट ते 15 आॅगस्ट यादरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्तानेच मनमाड येथे दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आलंय. मनमाडच्या या हेल्मेट वाटप आणि हेल्मेटचे महत्व सांगणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक केले जात आहे. तसेच शहरामध्ये स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.