देव पावला, सोनं खणखणीत घसरलं; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!

| Updated on: Sep 30, 2021 | 3:02 PM

नाशिकच्या (Nashik) सराफा बाजारपेठेत गुरुवारी (30 सप्टेंबर) सोने चक्क हजार रुपयांनी, तर चांदी तीन हजारांनी स्वस्त झाली.

देव पावला, सोनं खणखणीत घसरलं; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः नाशिकच्या (Nashik) सराफा बाजारपेठेत गुरुवारी (30 सप्टेंबर) सोने चक्क हजार रुपयांनी, तर चांदी तीन हजारांनी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर दहा ग्रॅममागे 46000 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले.

नाशिकच्या सराफा व्यापऱ्यांनी पुराच्या भीतीमुळे बुधवारी दुकानांची आवराआवर केली होती. त्यामुळे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास इथले व्यवहार सुरळीत सुरू झाले. सोन्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळते आहे. रोज शंभर ते दोनशे रुपयांनी भाव वाढतात किंवा उतरतात असेच चक्र या महिन्यात सुरू आहे. नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46600 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61800 रुपये नोंदवले. मंगळवारी या दरात मोठी चढउतार पाहायला मिळाली नाही. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46250 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45000 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 61000 रुपये होते. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 45500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे 62500 रुपये नोंदवले गेले. गुरुवारी सोन्याच्या घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 500 रुपयांनी घसरून दहा ग्रॅममागे 46000 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर तब्बल एक हजाराने घसरून दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. चांदीचे दर किलोमागे तीन हजारांनी घसरून 59500 रुपये नोंदवले गेले. दरम्यान, सोन्या-चांदीच्या या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल.

दसऱ्याकडे डोळे
सराफा व्यापाऱ्यांचे डोळे आता येणाऱ्या दसऱ्याकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत.

नाशिकच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याची घसरण पाहायला मिळाली. बुधवारी पुराच्या भीतीने अनेक जणांनी दुकानातल्या ऐवजाची आवराआवर केली होती. आता आज दुपारी उशिरा व्यवहार सुरू झाले आहेत.
– गिरीश नेवासे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

नाशिकच्या सराफा बाजारपेठेत गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46000 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 44500 नोंदवले. येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
– चेतन राजापूरकर, डायरेक्टर, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, महाराष्ट्र (Gold and silver became cheaper in Nashik’s bullion market)

इतर बातम्याः

Special Report: अहो, नाशिकच काय? गल्लीपासून दिल्लीपर्यंत…नावात बरंच काही आहे!

6 कोटींची उलाढाल ठप्प; नाशिकमध्ये महापुराच्या भीतीनं सराफा बंद